घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : भाजपाला पराभूत करण्यासाठी समोर या, नाना पटोले यांची...

Lok Sabha 2024 : भाजपाला पराभूत करण्यासाठी समोर या, नाना पटोले यांची प्रकाश आंबेडकरांना अकोल्यात साद

Subscribe

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांची जागावाटपातील चर्चा फिस्कटलेली आहे. पण तरी देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यात जाऊन साद घातली आहे.

अकोला : प्रकाश आंबेडकर आणखी रस्ते बंद झाली नाहीत. मी पुढाकार घेतो. तुमच्या भूमीत येऊन सांगतो. नामांकन मागे घेईपर्यंत वेळ आहे. किती जागा पाहिजे ते सांगा. 2-3 किती पाहिजे ते सांगा, पण भाजपाला पराभूत करण्यासाठी समोर या, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना साद घातली आहे. अकोला येथे बोलताना पटोलेंकडून हे विधान करण्यात आले आहे. (Lok Sabha Election 2024 Nana Patole appeal to Prakash Ambedkar in Akola)

महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामधील जागावाटपाची चर्चा फिस्कटल्यानंतर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ‘एकला चलो रे’चा नारा देत आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली. वंचितने आतापर्यंत 23 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. ज्यामुळे आता वंचित आणि मविआ एकत्र न येता वेगवेगळेच लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. परंतु, आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकर यांना एकत्र लढण्याची पुन्हा ऑफर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : भिंवडीची जागा राष्ट्रवादी शरद पवारांनीच राखली; पंकजा मुंडेंना बजरंग सोनवणेंचे आव्हान

प्रकाश आंबेडकर यांच्याकडे अर्ज मागे घेण्याच्या दिवसांपर्यंत वेळ आहे. मग पुढची लढाई सुरू होईल. मैदान सुरू झालं तर खुप मुद्दे आहेत, आयुध आहेत, असे म्हणत नाना पटोलेंनी आपली ऑफर दिली आहे. तसेच, तुम्ही म्हणता नाना पटोलेला अधिकार नाहीत. मी स्वत:च्या बळावर सांगतो की, सोबत या. पक्षश्रेष्ठींशी मी बोलेन. प्रकाश आंबेडकर अद्याप वेळ गेलेली नाही. 2014 आणि 2024 या दहा वर्षाच्या कालावधीत मतांचे मोठे विभाजन झाले होते. फुले-शाहू-आ़बेडकरांच्या महाराष्ट्रात मतांचे विभाजन करण्याचे षडयंत्र भाजपाने नेहमीच रचले आहे, असेही नाना पटोले यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

तर, माझ्या पोटनिवडणुकीत आंबेडकरांनी उमेदवार दिला. मी भाजपा सोडले तेव्हापासून प्रकाश आंबेडकरांनी माझा राग करणे सुरू केले. आंबेडकरांनी मुंबईतील संविधान बचाव रॅलीत माझा अपमान केला. आंबेडकर खर्गेंना कधीच भेटले नाहीत. आंबेडकरांनी माझ्या नावाने चुकीचे आरोप केलेत. आंबेडकरांनी माझा अपमान केला. आम्ही शेवटपर्यंत त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. माझे सर्वच पक्षात मित्र, देवेंद्र फडणवीसही माझे मित्र आहेत, असेही नाना पटोले यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

हेही वाचा… Jitendra Awhad : भारताच्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीला हे शोभणारे नाही, आव्हाडांचा आरएसएसवर निशाणा

माझ्या रक्तात मॅच फिक्सिंग नाही. डॉ. अभय पाटलांची उमेदवारी मागे घेणार आहेत, अशी अकोल्यात हवा उडवण्यात आली. पण मी सांगतो की असे होणार नाही. 400 पार नाही 420 करायची आहे. आंबेडकरांनी शिरूरमध्ये दिलेल्या उमेदवाराचे आडनाव चुकीचे आहे. मी पण वंचित आहे. शेतकऱ्याचा मुलगा आहे. बाबासाहेबांनी एका मिनिटात राजीनामा दिला होता. मी पण दिला. मग बाबासाहेबांचा खरा अनुयायी कोण? असा प्रश्नही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -