घरमहाराष्ट्रमंत्रिपद हुकलेले आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, खासदार विनायक राऊतांचा दावा

मंत्रिपद हुकलेले आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, खासदार विनायक राऊतांचा दावा

Subscribe

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, ज्यांना मंत्रिपदात स्थान देण्यात आले नाही. असे 8-10 आमदार हे ठाकरेंच्या संपर्कात आहेत. त्यांची नाव जरी सांगू शकत नसलो तरी यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मधील आमदारांचा समावेश आहे.

मुंबई : अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देत सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार नाराज असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे यांतील काही नाराज आमदार हे लवकरच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असा दावा काल वाय. बी. चव्हाण सेंटर येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात आला. त्यानंतर याबाबतचे ट्वीट भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी करत त्यांनी देखील या वृत्ताला एक प्रकारे दुजोरा दिला. पण आता ठाकरे गटातील खासदारानेच मंत्रिपद हुकलेले आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे. (MP Vinayak Raut claimed CM Ekamath Shinde MLA contact in Uddhav Thackeray)

हेही वाचा – भाजपच्या बड्या नेत्याचे धक्कादायक ट्वीट; शिंदे गटाच्या आमदारांमध्ये खळबळ

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, ज्यांना मंत्रिपदात स्थान देण्यात आले नाही. असे 8-10 आमदार हे ठाकरेंच्या संपर्कात आहेत. त्यांची नाव जरी सांगू शकत नसलो तरी यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मधील आमदारांचा समावेश आहे. जे मंत्रिपदावर डोळा ठेवून बसले होते, त्यातील बहुतेक जण आहेत. ज्यांच्याकडे मंत्रिपद आहेत, पण आता जाण्याची शक्यता आहे, ते कोलांट्या उड्या मारण्याच्या तयारीत असल्याचा टोला राऊतांनी लगावला आहे.

मंत्रिपदासाठी ज्यांनी कपडे शिवले होते, त्यातील अनेकांना कळलं की तिथे आपली वर्णी लागणार नाही, अशी खोचक टीका करत विनायक राऊत म्हणाले की, राहिलेल्या मंत्रिपदात जेव्हा तीन प्रमाणे वाटे होतील तेव्हा शिंदे गटाला फक्त दोन मंत्री मिळतील. बाकीचे सगळे असेच बसलेले असतील. याच मुद्द्यावरून नुकत्याच झालेल्या बैठकीत एकमेकांवर धावून जाण्याचे प्रकार झाल्याचा दावा राऊतांकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी हे सध्या मुंबईत असून त्यांनी शिंदे गटाचे आमदार हे या राजकीय घटनेनंतर प्रचंड अस्वस्थ असल्याचे ट्वीट केले आहे. त्यामुळे राजकारणात आणखी एक भूकंप होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना हा निर्णय 11 ऑगस्टपूर्वी घ्यावाच लागणार आहे. हा निर्णय जर कायद्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गेला तर शिंदेंसह त्यांचे 16 आमदार हे अपात्र ठरतील, ज्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल. पण त्याआधीच भाजपने अजित पवारांना सोबत घेतल्याने एकनाथ अपात्र ठरले तरी यामुळे भाजपला फारसा फरक पडणार नाही.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -