Thursday, May 16, 2024
घरमानिनीRelationshipतुमच्या आजूबाजूचे वातावरण टॉक्सिक असल्याचे 'या' संकेतावरुन ओळखा

तुमच्या आजूबाजूचे वातावरण टॉक्सिक असल्याचे ‘या’ संकेतावरुन ओळखा

Subscribe

एक फॅमिली ही सदस्यांमुळे तयार होते. जेव्हा घरातील मंडळींचे विचार उत्तम असतील तर नात्यात नेहमीच गोडवा टिकून राहतो. अन्यथा विरुद्ध स्थिती असेल तर घरात वाद, भांडण होत राहतात. याचा परिणाम अन्य लोकांवर सुद्धा होतो. टॉक्सिक रिलेशनशिप आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करते. अशातच तुमच्या आजूबाजूचे वातावरण टॉक्सिक आहे का हे पुढील संकेतावरुन ओळखू शकता. (Toxic family relations)

-प्रत्येक गोष्टीसाठी स्वत:ला दोषी ठरवणे
जर तुम्ही एखाद्या टॉक्सिक वातावरणात राहत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या पर्सनालिटीवर हळूहळू होऊ लागतो. प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी तुम्हाला ब्लेम केले जाते. अशातच तुम्ही प्रत्येक काम करण्यापूर्वी नाराज असल्याचे दिसून येता. त्याचसोबत लहान लहान चुकांसाठी तुम्ही स्वत:ला दोषी मानता.

- Advertisement -

-मॅन्युप्युलेशनची भीती
आयुष्यात तुम्ही कधीच तुमच्या मर्जीनुसार करू शकत नाहीत. तुम्हाला पूर्णपणे नियंत्रित करण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला जाते. अशातच तुम्हाला नेहमी भीती वाटत राहते की, दुसरा व्यक्ती तुम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या इच्छा कमी होतात आणि तुमच्यामध्ये उदासीनता येऊ लागते.

- Advertisement -

-एंग्जायटी
टॉक्सिक फॅमिली तुम्हाला प्रत्येक वेळी मानसिक टॉर्चर करण्याचा प्रयत्न करते. सर्व फॅमिली मेंबर्स तुमचा पाणउतारा करण्याचा आणि चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न करतात. ते तुमचे विचार ही कंट्रोल करु पाहतात. याचा परिणाम तुमच्या वागण्यावर आणि कामावर ही होतो. तुमच्यामध्ये काहीतरी करण्याचा उत्साह हा कमी होते. नेहमीच दुसऱ्यांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला तणाव आणि एंग्जायटी आल्यासारखे होते. (Toxic family relations)

-कोणत्याही कामासाठी नकार न देणे
घरात काहीवेळा असे वातावरण निर्माण केले जाते की, तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हणूच शकत नाही. या व्यतिरिक्त तुम्हाला आवडेल ते काम ही तुम्ही करू शकत नाही. प्रत्येकवेळी समजूतदारपणाने वागून आनंदीत राहण्याचा प्रयत्न केला जातो. याचा प्रभाव मानसिक आरोग्यावर होतो. यामुळे तुम्ही डिस्टर्ब राहता आणि तुमच्या वैवाहिक आयुष्यात ही समस्या येऊ लागतात.


हेही वाचा- सासूची बोलणी ऐकून राग येतोय, मग शांततेत द्या असे उत्तर

- Advertisment -

Manini