घरताज्या घडामोडीMumbai Zoo : राणीच्या बागेतील 47 प्राणी-पक्ष्यांचा मृत्यू; अनेकांना ह्रदयविकाराचा झटका

Mumbai Zoo : राणीच्या बागेतील 47 प्राणी-पक्ष्यांचा मृत्यू; अनेकांना ह्रदयविकाराचा झटका

Subscribe

दक्षिण मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहलयातील 47 प्राणी आणि पक्ष्यांच्या गेल्या वर्षभरात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या 47 प्राणी व पक्षांपैकी तब्बल 30 प्राण्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

दक्षिण मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहलयातील 47 प्राणी आणि पक्ष्यांच्या गेल्या वर्षभरात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या 47 प्राणी व पक्षांपैकी तब्बल 30 प्राण्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्राणी-पक्ष्यांच्या मृतांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (mumbai zoo 47 animals and birds died bmc report)

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने देशभरातील प्राणिसंग्रहायलयातील पक्षी आणि प्राणी यांच्याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातील माहितीनुसार, 2022-23 या वार्षिक अहवालात कोणत्या प्राण्यांच कोणत्या आजारामुळे मृत्यू झाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, हृदयविकाराचा झटका, श्वसनक्रिया बंद होणे आणि अनेक अवयव निकामी होणे यांसारख्या विविध आजारांना बळी पडत असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

- Advertisement -

‘या’ आजारांमुळे मृत्यू

1 एप्रिल 2022 ते 30 एप्रिल 2023 या काळात राणीच्या बागेतील 47 प्राणी, पक्ष्यांच्या विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये ठिपके असलेले हरीण, इमू, मॅकाक रीसस, सांबर, आफ्रिकन पोपट, कासव यांचा समावेश आहे. यातील 30 प्राण्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला.

‘या’ पक्ष्यांचा मृत्यू

राणीबागेतील ज्या पशू आणि पक्ष्यांचा मृत्यू झाला, त्यामध्ये पोपट आफ्रिकन ग्रे, कॉकॅटियल बडेरिगर, सांबर हरण, बडेरिगर, मॅकॉ मिलिटरी, तीतर गोल्डन, भारतीय फ्लॅपशेल, कासव, गोल्डन जॅकल, इमू इत्यादी पक्षी आणि प्राण्यांचा समावेश आहे. वृद्धापकाळाने सर्वात कमी मृत्यू झाल्याचे समजते.

- Advertisement -

प्राणी-पक्ष्यांच्या मृत्यूवर महापालिकेचे स्पष्टीकरण

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील प्राणी-पक्ष्यांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी केली जाते. जे प्राणी-पक्षी आजारी आढळतात त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जातात. उपचारादरम्यान प्राण्याचा मृत्यू झाला किंवा कुठल्याही प्रकारची आजारपाणाची लक्षणे नसतानाही अचानक मृत्यू झाला तर संबंधित प्राणी-पक्ष्याचे शवविच्छेदन करणे अनिवार्य आहे. यातील बहुसंख्य प्राणी-पक्ष्यांचा मृत्यू हा अंतर्गत अवयव निकामी होणे, अस्तित्व राखण्यासाठी दोन प्राणी वा पक्ष्यांमध्ये झालेल्या झटापटी, वृद्धापकाळ आदी कारणांमुळे होत असल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.


हेही वाचा – BMC : जनतेच्या कराच्या पै अन् पै चा हिशोब…; इकबाल सिंह चहलांच्या हकालपट्टीनंतर आदित्य ठाकरेंचे ट्वीट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -