घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : सातारा मतदारसंघात नवा ट्विस्ट; उदयनराजे तयारीत, आता नरेंद्र...

Lok Sabha 2024 : सातारा मतदारसंघात नवा ट्विस्ट; उदयनराजे तयारीत, आता नरेंद्र पाटीलही इच्छूक

Subscribe

Lok Sabha Election 2024 लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. येत्या 19 मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानप्रक्रीया पार पडणार आहे. मात्र, अद्याप महाराष्ट्रातील महायुती अथवा महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटप पूर्ण झालेले नाही. त्यात ज्या जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत, त्या उमेदवारांवर मित्र पक्षातील नेतेमंडळी नाराज आहे. तर काही ठिकाणी अजूनही उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. सातारा लोकसभा मतदारंसघात एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

सातारा : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. येत्या 19 मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानप्रक्रीया पार पडणार आहे. मात्र, अद्याप महाराष्ट्रातील महायुती अथवा महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटप पूर्ण झालेले नाही. त्यात ज्या जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत, त्या उमेदवारांवर मित्र पक्षातील नेतेमंडळी नाराज आहे. तर काही ठिकाणी अजूनही उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. सातारा लोकसभा मतदारंसघात एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण या मतदारसंघातून माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी तयारीला सुरूवात केली असतानाही आता, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीही लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे आता या मतदारसंघातील तिढा आणखी वाढला असून उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Lok Sabha Election 2024 Satara Lok Sabha Constituency Udayanraje Bhosale and Narendra Patil)

लोकसभेच्या सातारा मतदारसंघातून निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवण्यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तयारीला सुरूवात केली आहे. त्यानुसार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर विविध कार्यक्रमात उपस्थिती दर्शवत ते एकप्रकारे स्वत:चा प्रचार करत आहेत. त्यानुसार, सातारा लोकसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीतील घटक पक्षांच्या कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या संवाद मेळावा घेण्यात आला. याच मेळाव्यात नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे भोसले यांच्या समोर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.

- Advertisement -

हेही वाचा – Loksabha election 2024 : पाचव्या टप्प्यातील निवडणुकीचे प्रथम प्रशिक्षण संपन्न

नेमकं काय म्हणाले नरेंद्र पाटील?

“मलाही संधी मिळणार आहे. मी अजुनही अपेक्षीत असल्याचे व्यासपिठावर जाहीरपणे सांगतो. आमचे दिल्लीला कोणीच नाही. तुम्ही 10 वर्षे लोकसभेचे नेतृत्व केले. राज्यसभेचेही तुम्ही नेतृत्व करत आहात. तुम्ही जसे दिल्लीला गेलात, तसे आमचे मात्र दिल्लीत कोणी नाही. आम्ही सागर बंगला आणि भाजपचे मुंबईचे कार्यालय यांच्याच संपर्कात आहोत. मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ दिला. त्याद्वारे आपले सहकारी उपस्थित होते. त्यांनी काय सांगीतले मला माहित नाही. मात्र मी त्यांना आपण जो निर्णय घ्याल तो नरेंद्र पाटील म्हणुन भाजपचा कार्यकर्ता आणि माथाडी कामगार म्हणुन अंतिम राहिल हे सांगतो”, असे नरेंद्र पाटील या मेळाव्यात म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सध्या महायुतीकडुन इच्छुक असणाऱ्या कोणालाही ग्रीन सिग्नल देण्यात आलेला नाही. महायुतीची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी खासदार उदयनराजे भोसले, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, पुरुषोत्तम जाधव अन्य काही जणांनी प्रयत्न सुरु केले आहेत. Lok Sabha Election 2024


हेही वाचा – Lok Sabha 2024: राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा द्यावा; फडणवीसांनी व्यक्त केली अपेक्षा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -