Wednesday, April 24, 2024
घरमानिनीRelationshipमहिलांचा लग्नानंतर sex interest कमी होतो, 'ही' आहेत कारणे

महिलांचा लग्नानंतर sex interest कमी होतो, ‘ही’ आहेत कारणे

Subscribe

लग्न हे केवळ दोन व्यक्ती एकत्रित राहण्यासाठीचे नाते नव्हे. तर या नात्यात भावनिक, आध्यात्मिक, शारिरीक आणि लैंगिक इच्छा पूर्ण करण्याची सुद्धा जबाबदारी असते. परंतु काही लोक लग्नांतर या नात्यात राहण्यास कंटाळतात. तसेच काही लोकांना त्यांच्या नात्यातील कामुकता संपलीय असे ही वाटते. जर तुमच्या नात्यात सर्वकाही ठिक चालले असेल तर यौन संबंधावेळी तुम्ही आनंदित राहता.पण या उलट स्थिती असेल तर गोष्टी बिघडतात. अशातच सेक्स करण्याची होत नाही.

खरंतर भारतात सेक्स एक टॅबू आहे, खासकरुन महिलांसाठी. काही महिला या लग्नापूर्वी सेक्स करणे किंवा त्या बद्दल बोलणे टाळतात. पण लग्नानंतर हिच गोष्ट तुम्हाला वैवाहिक आयुष्यातील एका कर्तव्याप्रमाणे करावी लागते. पण खरंच महिलांचा लग्नानंतर सेक्स इंटरेस्ट कमी होतो का? याच बद्दल जाणून घेऊयात.

- Advertisement -

-सेक्स बद्दल काही गोष्टी न कळणे
सेक्स हा आपल्या येथे टॅबू मानला जात असल्याने त्याबद्दल खुलेपणाने बोलणे टाळले जाते. त्यामुळे त्यांना कळत नाही आपल्यासाठी ही गोष्ट किती महत्वाची आहे. अशातच नात्यात सेक्स हे नियमित रुपात न केल्यास त्या बद्दलची भावना कमी होत जाते. त्यांना असे वाटू लागते की, सेक्स मध्ये प्लेजरचे काम केवळ पुरुषांचेच आहे.

-जबाबदाऱ्यांची कारणे
बहुतांश महिला घर, मुलं आणि करियरमध्ये ऐवढ्या व्यस्त असतात की, सेक्सला ते फार कमी महत्व देतात. काही महिला कामाच्या थकव्यामुळे त्यांना सेक्स करणे काहीवेळेस नकोसे वाटते.

- Advertisement -

-हार्मोनल असंतुलन
महिलांच्या वाढत्या वयासह त्यांच्यामध्ये हार्मोन्स बदलत राहतात. अशातच काही महिलांमध्ये सेक्स बद्दलची भावना कालांतराने कमी होऊ लागते.

-प्रेग्नेंसीनंतर शरिराबद्दल असुरक्षित वाटणे
बाळाला जन्म दिल्यानंतर भावनात्मक, शारिरीक आणि मानसिक रुपात काही गोष्टी बदलतात. तसेच बाळाची जबाबदारी आली की पूर्ण लक्ष त्याच्याकडे दिले जाते. अशातच महिला सेक्स करण्यासाठीचा विचार फार कमी करतात. त्यांना ते करणे असुरक्षित वाटते.


हेही वाचा- महिलांनी Vigra खाल्ल तर काय होईल?

- Advertisment -

Manini