घरपालघरVasai News: बेकरीमालकाचा अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Vasai News: बेकरीमालकाचा अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Subscribe

तेव्हा आणखी तीन महिलांनी आपल्या अल्पवयीन मुलींशी असाच प्रकार घडल्याचे सांगितल्यावर अलीचा विकृत प्रकार उजेडात आला.

वसई : नालासोपार्‍यातील प्रसिध्द सितारा बेकरीच्या मालकाने अत्याचार केल्याची चार अल्पवयीन मुलींनी तक्रार केल्यानंतर तुळींज पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अफजल हुसैन अली (३३) असे त्याचे नाव आहे. नालासोपारा पूर्वेकडील नगीनदास पाडा परिसरात रहमतनगर येथे प्रसिध्द सितारा बेकरी आहे. सोमवारी एक अल्पवयीन मुलगी बेकरीत केक खरेदी करायला गेली असता अलीने तिच्याशी गैरवर्तन केले. यामुलीने घरी आईला येऊन हा प्रकार सांगितल्यानंतर पिडीतेच्या आईने परिसरातील महिलांना हा प्रकार सांगितला. तेव्हा आणखी तीन महिलांनी आपल्या अल्पवयीन मुलींशी असाच प्रकार घडल्याचे सांगितल्यावर अलीचा विकृत प्रकार उजेडात आला.

पिडीत अल्पवयीन मुलींच्या आईंनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी अलीविरोधात विनयभंग, बलात्कार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. बेकरीत खेरदीसाठी एकट्या येणार्‍या अल्पवयीन मुलींवर अली अत्याचार करत असल्याचे उजेडात आले आहे. अलीने अजून काही मुलींशी असा प्रकार केला असावा, असा पोलिसांचा संशय असून त्यादृष्टीने तपास केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -