घरमनोरंजनसुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला हत्या म्हणणाऱ्या वैशाली ठक्करच्या आत्महत्येचे गूढ

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला हत्या म्हणणाऱ्या वैशाली ठक्करच्या आत्महत्येचे गूढ

Subscribe

त्याच्या मृत्यूने मी एवढी अस्वस्थ झाले होते की मी दोन-तीन दिवस रडले. सुशांत या जगात नाही हे मी स्वीकारू शकत नाही. सर्व जण म्हणत होते की ही आत्महत्या आहे पण हा खून आहे असं वाटत होते. काहीतरी चुकीचे आहे असंही वाटत होते.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने आत्महत्या केली आहे. मागील बऱ्याच काळापासून अभिनेत्री वैशाली ठक्कर इंदूरमध्ये राहत होती वैशालीने तिने तिच्या इंदूरच्या राहत्या घरात आत्महत्या केली. वैशाली ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण होती दरम्यान दोघांचाही एक फोटो सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होत आहे. दरम्यान वैशालीने अभिनेता सुशांत सिंह राजपूत (shashant singh rajpu) याच्या मृत्यूवर अनेक प्रश्नसुद्धा उपस्थित केले होते आणि सुशांतचा आत्महत्या नसून खून असल्याचे म्हटले होते. सुशांत सिंह राजपूतचा खरा मारेकरी रिया चक्रवर्तीच्या मागे लपला आहे, असेही म्हटले जात होते.

सुशांतच्या मृत्यूने वैशाली पूर्णतः तुटून गेली होती

- Advertisement -

2020 मध्ये वैशालीचा मित्र आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर वैशाली ठक्कर पूर्णपणे तुटून गेली होती. त्यासंदर्भात तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिचे दुःख व्यक्त केले होते. वैशालीला विश्वासच बसत नव्हता की सुशांतने हे जग सोडले आणि त्याला खून म्हटले जक्त आहे. वैशालीने सुशांतसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, माझे रडणे थांबत नाही आहे. सुशांत एक उत्तम व्यक्ती आणि अभिनेता होता. मला वाटले की आपण नेहमी मित्र राहू. का सुशांत?’ दोन वर्षांपूर्वी, वैशालीला कल्पनाही नसेल की तिच्या आयुष्यात असे कधी होईल आणि ती अचानक हे जग सोडून जाईल. वैशालीच्या आत्महत्येची बातमी समोर आल्यापासून तिचे जवळचे मित्र आणि तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaishali Takkar (@misstakkar_15)

एका मुलाखतीदरम्यान वैशाली ठक्कर (vaishali thakkar) सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित करत ती म्हणाली, ‘मृत्यूनंतर काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सुशांतच्या मृतदेहाचे फोटो माझ्याकडेही आले होते. पण ते बघायची माझी हिंमत होत नव्हती. त्याच्या मृत्यूने मी एवढी अस्वस्थ झाले होते की मी दोन-तीन दिवस रडले. सुशांत या जगात नाही हे मी स्वीकारू शकत नाही. सर्व जण म्हणत होते की ही आत्महत्या आहे पण हा खून आहे असं वाटत होते. काहीतरी चुकीचे आहे असंही वाटत होते.

- Advertisement -

वैशाली पुढे म्हणाली की, सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी आधी चित्रपट माफियावर आरोप झाले, पण नंतर रिया चक्रवर्ती संशयाच्या भोवऱ्यात आली. वैशाली ठक्करला जेव्हा विचारण्यात आले की सुशांत सिंग राजपूतच्या हत्येला रिया चक्रवर्ती जबाबदार आहे का, तेव्हा ती म्हणाली, ‘हे टीमवर्क आहे. एक व्यक्ती हे करू शकत नाही. मला वाटतं यात अनेक लोक सहभागी आहेत आणि खरे आरोपी रिया चक्रवर्तीच्या मागे लपले आहेत. सुशांत सिंग या जगात नाही यामागे रिया जबाबदार आहे असंही वैशाली ठक्कर म्हणाली.


हे ही वाचा –   ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्रीची राहत्या घरात आत्महत्या

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -