घर देश-विदेश "किसी की मुस्कुराहटों पे हो निसार'; प्रियंका गांधींनी गीतातून वाहिली राजीव गांधींना...

“किसी की मुस्कुराहटों पे हो निसार’; प्रियंका गांधींनी गीतातून वाहिली राजीव गांधींना आदरांजली

Subscribe

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी आपल्या वडिलांची आठवण करून भावनिक ट्वीट केले आहे. आज रविवारी देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधी यांची ७९ वी जयंती आहे. प्रियंका गांधी यांनी हिंदीतील एका सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी ट्वीट करत म्हटलं की तुमची आठवण माझ्या डोळ्यात नेहमीच पाणी आणते.

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी आपल्या वडिलांची आठवण करून भावनिक ट्वीट केले आहे. आज रविवारी देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधी यांची ७९ वी जयंती आहे. प्रियंका गांधी यांनी हिंदीतील एका सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी ट्वीट करत म्हटलं की तुमची आठवण माझ्या डोळ्यात नेहमीच पाणी आणते. ( Kisi ki muskurahton pe ho nisar Priyanka Gandhi pays tribute to Rajiv Gandhi in song )

प्रियंका गांधींनी लिहिले की, किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उदार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है…” प्रियंका गांधी यांनी पुढे लिहिले, “…जिंदा है हमीं से नाम प्यार का, मेल्यावरही कुणीतरी तुमची आठवण काढेल, जिंदा है हमीं से नाम प्यार का, की मर के भी किसी को याद आएंगे, किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे, कहेगा फूल हर कली से बार बार, जीना इसी का नाम है। प्रियंका गांधी यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यात राजीव गांधींच्या व्हिडीओला प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांच्या अनारी चित्रपटातील ओळी लावण्यात आल्या आहेत.

वीरभूमी येथे वडिलांना वाहिली श्रद्धांजली

- Advertisement -

प्रियंका गांधी यांनी त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि आई सोनिया गांधी यांच्यासह वीरभूमी येथे वडिलांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह पक्षाचे इतर वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. प्रियंका गांधी लिहितात, “या ओळी मला नेहमी तुझी आठवण करून देतात आणि आजपर्यंत जेव्हाही मी हे गाणे ऐकते तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येते.

भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज जयंती

- Advertisement -

लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LLTE) या श्रीलंकेतील सशस्त्र तमिळ फुटीरतावादी संघटनेने त्यांची हत्या केली. भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज जयंती साजरी होत आहे. राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी झाला. 1991 मध्ये निवडणूक रॅलीत झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांची हत्या झाल्याने देशभरात हाहाकार उडाला.

( हेही वाचा: राजीव गांधींच्या राजकीय प्रवेशाला सोनिया गांधींचा होता विरोध, झाले देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान )

- Advertisment -