हिंदी चित्रपटांपासून मराठी चित्रपटांपर्यंत येत्या 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार ‘हे’ भन्नाट चित्रपट

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई झालेली नाही. बॉलिवूडमध्ये 25 ऑक्टोबर रोजी अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ आणि अजय देवगणचा ‘थाँक गॉड’ चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, या चित्रपटांना प्रेक्षकांनी हवी तशी पसंती दिलेली नाही. दरम्यान, आता नोव्हेंबर महिना सुरु होईल. त्यामुळे येत्या आठवड्यात कोणकोणते चित्रपट प्रदर्शित होतील याकडे सर्वंच प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

नोव्हेंबर महिना सुरु व्हायला अवघा एक दिवस बाकी आहे. येत्या 4 नोव्हेंबर रोजी हिंदीमध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 6 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

हिंदीमध्ये 4 नोव्हेंबर रोजी हे चित्रपट होणार प्रदर्शित

  • फोन भूत
    अभिनेत्री कतरीना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांचा बहुचर्चित ‘फोन भूत’ चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
  • डबल एक्सएल
    या चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी मुख्य भूमिकेत दिसतील. या चित्रपटाची गोष्ट जाड, वजनदार महिलांच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट बॉडी शेमिंगला सडेतोड उत्तर देताना दिसून येईल. चित्रपटामध्ये वजनला विनोदी अंदाजात दाखवण्यात आलं आहे.
  • मिली
    ‘मिली’ चित्रपटाचे दिग्दर्शन मथुकुट्टी जेवियर यांनी केले असून यामध्ये अभिनेत्रा जान्हवी कपूर मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट मल्याळममधील ‘हेलेन’ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये जान्हवी व्यतिरिक्त सनी कौशल आणि मनोज पाहवाभी देखील आहेत.

बॉलिवूडमधील वरील तीन चित्रपटांव्यतिरीक्त हिंदीमध्ये ‘कुत्ते’, ‘धूप छांव’,’रामराज्य’ हे चित्रपट देखील 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहेत.

शिवाय मराठीमध्ये देखील 4 नोव्हेंबर रोजी तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डेचा ‘मन कस्तुरी रे’ तसेच ’36 गुण’, ‘प्रेम प्रथा धुमशान’, ‘प्रेम महणजे काय असंत’ आणि ‘पल्याड’ हे 5 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.


हेही वाचा :

‘भेडिया’ चित्रपटातील ‘ठुमकेश्वरी’ गाण्यात श्रद्धा कपूरला पाहताच सोशल मीडियावर ‘स्त्री 2’ची चर्चा