घरमहाराष्ट्रनाशिकसंतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा : अभूतपूर्व अनुभूती, वायुवेगाने धावले अश्व रिंगण...

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा : अभूतपूर्व अनुभूती, वायुवेगाने धावले अश्व रिंगण सोहळ्यात वारकरी तल्लीन

Subscribe

नाशिक : दिंडीतील वैष्णवांचा पहिला रिंगण सोहळा सिन्नर येथील दातली शिवारात अत्यंत उत्साहात पार पडला. पंढरपूरच्या विठू माऊलीची आस लागलेल्या वारकर्‍यांनी दातली येथील शेत शिवारात वैष्णवांचा रिंगण सोहळा पार पडला. वायुवेगाने धावणारे अश्वमेध, टाळ-मृदुंगाच्या भक्ती सागरात तल्लीन झालेले वारकरी, माऊलीचा जयघोष हे सर्व डोळ्यांत साठवून ठेवणारे चित्र विलोभनीय होते.

संत निवृत्तीनाथांच्या पालखी बुधवारी (दि.७) दातलीत पोहोचली. त्यानंतर ध्वजकरी, विणेकरी, तालवादक आणि तुळशी महिलांचे रिंगण पार पडल्यावर शेवटी माऊलींच्या आश्वाचा रिंगण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. सर्वत्र ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय’ हा जयघोषाने सारा परिसर दुमदुमून गेला होता. तत्पूर्वी सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी येथील मुक्काम आटोपल्यावर पालखीचे प्रस्थान सिन्नर नगरीतून पुढे जात कुंदेवाडी, मुसळगाव आणि नंतर दातली गावी रिंगण स्थळाकडे मार्गस्थ झाले सकाळपासूनच मोठ्या संख्येने वारकर्‍यांचा सुरू होता. सकाळी कुंदेवाडी येथे आमरस आणि पुरणपोळीचा पाहुणचार घेतल्यानंतर पालखी दिंडी दातलीकडे रवाना
झाली होती.

- Advertisement -

सकाळपासूनच वारकर्‍यांची रेलचेल असल्यामुळे वारकर्‍यांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून येत होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास पायी दिंडी पालखी सोहळा दातलीत पोहोचला. यानंतर अश्वांची पूजा झाल्यानंतर वारकर्‍यांनी दिंडीच्या ध्वजाने रिंगणाला प्रदक्षिणा पूर्ण केल्या. स्वारीचा अश्व रिंगणासाठी सोडण्यात आला. त्याच्या पाठोपाठ मानाचा अश्वही धावला. यावेळी लाखो भाविकांनी ’ज्ञानोबा माऊली तुकाराम’ नामाचा एकच जयघोष केला. या जयकारात नेत्र दीपक दौड करीत हा रिंगण सोहळा आठवणीत साठवून ठेवला.

असा रंगला सोहळा

दातली येथील लक्ष्मण रामभाऊ शेळके व कैलास रामभाऊ शेळके यांच्या मालकीच्या साडेतीन एकर क्षेत्रावर अखीव रोखी रेखीव गोल रिंगणासाठी मैदान सुशोभित करण्यात आले होते. रिंगणाच्या मध्यभागी रांगोळी काढण्यात आली होती. तर अश्वांचा रिंगणाच्या मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. निवृत्तीनाथांची पादुका व मुकट असलेली पालखी खांद्यावर घेऊन रिंगणात आणण्यात आली. यानंतर देव रिंगण, टाळकरी रिंगण आणि विणेकरी रिंगण पार पडले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -