घरदेश-विदेशLok Sabha : सलग तिसऱ्यांदा मतदारांचा आशीर्वाद मिळेल, पंतप्रधान मोदींना विश्वास

Lok Sabha : सलग तिसऱ्यांदा मतदारांचा आशीर्वाद मिळेल, पंतप्रधान मोदींना विश्वास

Subscribe

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज, शनिवारी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. 19 एप्रिलपासून सात टप्प्यांत होणाऱ्या या निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत, सलग तिसऱ्यांदा मतदारांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : देशात 7, तर महाराष्ट्रात 5 टप्प्यांत मतदान; लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

- Advertisement -

लोकशाहीच्या सर्वात मोठा उत्सवाचा शुभारंभ झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. भाजपा – राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) या निवडणुका लढवण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. सुशासन आणि लोकसेवेची आतापर्यंतची कामगिरी घेऊन आम्ही लोकांमध्ये जाऊ. 140 कोटी कुटुंबातील सदस्य आणि 96 कोटी मतदारांचा पूर्ण स्नेह आणि आशीर्वाद आम्हा सलग तिसऱ्यांदा मिळेल, असा मला पूर्ण विश्वास असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

जेव्हा आम्ही 10 वर्षांपूर्वी देशाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा देश आणि तेथील नागरिक इंडी आघाडीच्या गैरकारभारामुळे त्रस्त होते. घोटाळे आणि धोरण लकव्याने सर्व क्षेत्रे व्यापली होती. देश निराशेच्या गर्तेत गेला होता आणि जगानेही भारतावर विश्वास ठेवणे सोडले होते. त्या परिस्थितीतून आम्ही देशाला बाहेर काढले आणि आज भारत झपाट्याने प्रगती करत आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.

प्रामाणिक, दृढनिश्चयी आणि प्रबळ इच्छाशक्ती असलेले सरकार काय करू शकते याची जाणीव आज प्रत्येक भारतीयाला होत आहे. त्यामुळेच आमच्या सरकारकडून प्रत्येक देशवासीयांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. म्हणूनच आज भारताच्या कानाकोपऱ्यातून आणि समाजाच्या प्रत्येक घटकातून एकच आवाज ऐकू येत आहे – अब की बार 400 पार, असा दावा त्यांनी केला आहे.

हेही वाचा – Election Commission : एकूण 97 कोटी नागरिक बजावणार मतदानाचा हक्क, 1.8 कोटी नवे मतदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -