घरक्राइमRajasthan Crime : धावत्या बसमध्ये महिलेवर बलात्कार! राजस्थानमधील घटनेने खळबळ

Rajasthan Crime : धावत्या बसमध्ये महिलेवर बलात्कार! राजस्थानमधील घटनेने खळबळ

Subscribe

काही महिन्यापूर्वीच एनसीआरबीचा अहवाल जाहीर झाला असून, त्यामध्ये देशातील गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये महिलांवरील अत्याचारातही वाढ झाल्याचे समोर आले. असे असतानाच आता भाजपचे सरकार असलेल्या राजस्थानमध्येही महिला अत्याचाराची घटना उघडल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे.

जयपूर : राजस्थानमध्ये आज मंगळवारी (9 जानेवारी) सकाळी एका 30 वर्षीय महिलेने खासगी बसच्या कंडक्टरवर बलात्काराचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी रात्री उशिरा जयपूरहून भरतपूरला जात असताना कंडक्टरने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा राजस्थानमधील महिला असुरक्षित असल्याचे चित्र दिसून येत आहे. (Rajasthan Crime Woman raped in a running bus Excitement over the incident in Rajasthan)

काही महिन्यापूर्वीच एनसीआरबीचा अहवाल जाहीर झाला असून, त्यामध्ये देशातील गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये महिलांवरील अत्याचारातही वाढ झाल्याचे समोर आले. असे असतानाच आता भाजपचे सरकार असलेल्या राजस्थानमध्येही महिला अत्याचाराची घटना उघडल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे.
महिलेवर घडलेल्या बलात्काराची घटना ही बयाना पोलीस ठाण्यांतर्गत घडली. भरतपूर येथील महिला पतीसोबत जयपूरमध्ये राहते. पीडित महिला सोमवारी (8 जानेवारी) संध्याकाळी भरतपूरला जाण्यासाठी जयपूर येथे खासगी बस (राजस्थान पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट) मध्ये चढत होती. जयपूरहून बस बायनाला पोहोचली जो शेवटचा थांबा होता. मात्र, त्या रात्री महिलेला भरतपूरला जाण्यासाठी कोणतेही वाहन मिळाले नाही. महिलेने बस कंडक्टरकडे वाहन घरी पोहोचवण्यासाठी मदत मागितली. मदतीचे आश्वासन देऊन आरोपीने तिला पुन्हा बसमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

- Advertisement -

हेही वाचा :New Emission Test : आता नवीन नियमानुसार होणार प्रदूषण चाचणी; अशी असणार प्रक्रिया

राजस्थान स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (RIICO) येथे उभ्या असलेल्या बसमध्ये आरोपीने बलात्कार केला आणि नंतर ते फरार झाला. पीडितेने बयाना पोलीस ठाण्यात जाऊन तिच्यासोबत घडलेलं कृत्य पोलिसांना सांगून तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी जितेंद्र गुर्जरविरुद्ध भादंवि कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. याआधी पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणीसुद्धा केली.

- Advertisement -

हेही वाचा : IndiGo कंपनीने दिला ग्राहकांना झटका! प्रवाशांना ‘या’ सीटसाठी भरावे लागणार अतिरिक्त शुल्क

कंडक्टरसह बसचालकही अटकेत

बयाना पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील कुमार यांनी सांगितले की, बस कंडक्टरला अटक करण्यात आली आहे. पीडित विवाहिता ही जयपूरहून आली होती आणि तिला भरतपूरला जायचे होते. संधीचा फायदा घेत कंडक्टरने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी कंडक्टरसह चालकाला अटक करून बस ताब्यात घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -