घरमनोरंजनरश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा फेब्रुवारीमध्ये करणार साखरपुडा?

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा फेब्रुवारीमध्ये करणार साखरपुडा?

Subscribe

टॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या जोडीचे अनेक चाहते आहेत. या दोघांनी बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. या चित्रपटांमुळे बऱ्याचदा या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा सुरु असतात. दरम्यान, अशातच आता हे दोघेही लवकरच साखरपुडा करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

रश्मिका-विजय करणार साखरपुडा?

मागील अनेक महिन्यांपासून रश्मिका आणि विजयच्या अफेअरची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी हे दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं म्हटलं जात होतं. अशातच आता हे दोघे लवकरच साखरपुडा करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचे कुटुंबीय त्यांच्या लग्नाला तयार झाले असून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हे साखरपुडा करतील. दरम्यान, अद्याप विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाने याबाबत काही खुलासा केलेला नाही. या आधी देखील मालदीवच्या ट्रिपवर ते दोघं एकत्र असल्याचं अनेकजण म्हणत होते.

- Advertisement -

‘या’ चित्रपटांमध्ये दिसले होते एकत्र

रश्मिका आणि विजयने आत्तापर्यंत‘डियर कॉमरेड’ आणि ‘गीता गोविंदम’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. सध्या रश्मिका तिच्या ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तर विजय त्याच्या ‘फॅमिली स्टार’मुळे चर्चेत आहे.

 


हेही वाचा  : इरा-नुपूरच्या मेहंदी फंक्शनचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -