घरमनोरंजनRaj Thackeray यांच्या 'त्या' वक्तव्यावर अभिनेत्री Tejaswini Padit म्हणाली...

Raj Thackeray यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अभिनेत्री Tejaswini Padit म्हणाली…

Subscribe

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखिल भारतीय नाट्य संमेलनाला काल रविवारी (ता. 07 जानेवारी) हजेरी लावली होती. यावेळी त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. अभिनेते दीपक करंजीकर यांनी राज ठाकरे यांच्याशी या मुलाखतीत संवाद साधला. ‘ नाटक आणि मी’ या विषयावर ही प्रकट मुलाखत पार पडली. मराठी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील कलाकारांनी एकमेकांचा आदर ठेवला पाहिजे. घरात आपण एकमेकांना ज्या टोपण नावाने हाक मारतो ते सार्वजनिक मंचावर टाळले पाहिजे, तरच लोक तुम्हाला मान देतील तुमचा आदर करतील, असे खडेबोल यांनी मराठी नाट्य संमेलनाच्या मंचावरून सुनावले. पण त्यांच्या या वक्तव्यावर आता अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने आपले मत व्यक्त केले आहे. याबाबतचा व्हिडीओ तेजस्विनीने आपल्या इन्स्टाग्रामला शेअर करत राज ठाकरे यांच्या मताशी सहमती दर्शविली आहे. (Agreeing with Raj Thackeray’s ‘that’ statement, actress Tejaswini Padit said)

हेही वाचा… Raj Thackeray : ‘तुम्ही एकमेंकाना मान देणं शिका’; राज ठाकरेंचा मराठी कलाकारांना सल्ला

- Advertisement -

अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने राज ठाकरे यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, “थेट, परखड आणि 100 टक्के बरोबर राजसाहेब!” केवळ इतकंच तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे. म्हणजेच मराठी कलाकार हे एकमेकांशी आदराने वागत नाही, असे स्वतः एका मराठी अभिनेत्रीकडूनच सांगण्यात आल्याने आता याबाबतच्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. तेजस्विनीने पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शविली आहे का? तर असे नाही. तिने यापूर्वी देखील अनेकदा राज ठाकरेंच्या वक्तव्याशी सहमत आहे, असे म्हणत त्यांचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

- Advertisement -

काय म्हणाले होते राज ठाकरे?

पूर्वीच्या काळी मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीत अनेक सुपरस्टार होते. मात्र आता केवळ कलाकार राहिलेले आहेत. मराठी कलाकार एकमेकांशी बोलताना टोपण नावाने किंवा शॉर्ट नावाने हाक मारतो. तुम्ही एकमेकांना मान दिला नाही तर प्रेक्षक तुम्हाला मान कसा देतील? एकमेकांना मान दिला तर मराठी रंगभूमीला चांगले दिवस येतील. दक्षिणेकडील सुपरस्टार रजनीकांत आणि ज्येष्ठ संगीतकार इलायराजा यांचे उदाहरण घ्या. दोघे सार्वजनिक ठिकाणी बोलताना एकमेकांना सर म्हणून संबोधतात. कशासाठी ही आपुलकी? ही आपुलकी तुमच्या घरात ठेवा. लोकांसमोर येता तेव्हा एकमेकांना मान द्या. तरंच या सिनेसृष्टीला अर्थ आहे. साऊथमधील नवे लोक पाहा कसे नम्र बसतात. आपल्याकडे कोणीही येते आणि खांद्यावर हात ठेऊन बसतात, अशा परखड शब्दांत राज ठाकरेंनी मराठी कलाकारांची कान उघडणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -