घरक्राइमSalman Khanच्या फार्महाऊसमध्ये घुसखोरीचा प्रयत्न; दोन जणांना अटक, बनावट आधारकार्ड जप्त

Salman Khanच्या फार्महाऊसमध्ये घुसखोरीचा प्रयत्न; दोन जणांना अटक, बनावट आधारकार्ड जप्त

Subscribe

मुंबई – बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानला (Actor Salman Khan) लॉरेन्स बिश्नोई गँगने जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. त्यामुळे त्याची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये कोणतीही चूक होऊ नये यासाठी सुरक्षेचा नियमीत आढावा घेतला जातो. मात्र असं असूनही एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर दोन जणांनी बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला. या दोघांना सुरक्षा रक्षकांनी वेळीच पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले आहे.

पोलिसांनी दोन जणांना अटक केले आहे. त्याबद्दल माहिती देतांना पोलिसांनी सांगितले, की दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या हलचाली संशयास्पद होत्या. पकडण्यात आलेल्या दोघांनी ते सलमान खानचे चाहते असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी पकडलेल्या दोघांकडूनही बनवाट आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील संशय अधिक बळावला आहे. पोलिस त्यांची कसून चौकशी करत आहे.

- Advertisement -

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये दोन जणांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न गंभीर आहे. कारण सलमान खानला गँगस्टर बिश्नोई आणि गोल्डी बरारकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. या दोन्ही गँगस्टर्सनी सलमानवर दोनवेळा हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यामुळे पनवेल येथील फार्महाऊसवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

मृत्यूला व्हिसा लागत नाही

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सलमान खानला बिश्नोई गँगने धमकी दिली होती. फेसबुकवर गिप्पी ग्रेवालला उद्देशून दिलेल्या धमकीमध्ये लिहिले आहे – “तुम्ही सलमान खानला तुमचा भाईजान मानता, पण आता तुमच्या ‘भाईजान’ ला तुम्हाला वाचवण्याची वेळ आली आहे, हा संदेश सलमान खानसाठीही आहे. दाऊद तुम्हाला वाचवेल या भ्रमात राहू नका; तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूवर तुझी प्रतिक्रिया आम्ही पाहिली. सिद्धू मुसेवाला कोणत्या प्रकारचा माणूस होता आणि त्याचे गुन्हेगारांशी किती संबंध होते हे आम्हा सर्वांना माहीत आहे. आता तू आमच्या रडारवर आहे. हा फक्त ट्रेलर आहे, पूर्ण चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. तुला ज्या देशात जायचंय तिकडे जाऊन ये, पण लक्षात ठेव, मृत्यूला व्हिसाची गरज नसते; तो निश्चितपणे येतच असते.

- Advertisement -

हेही वाचा : रक्षकच बनले भक्षक: Mumbai Police उपायुक्त – निरीक्षकांकडून आठ महिला पोलिसांवर बलात्कार, व्हिडीओ चित्रिकरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -