Saturday, April 27, 2024
घरमानिनीHealthWorkout करताय मग आधी 'हे' वाचा

Workout करताय मग आधी ‘हे’ वाचा

Subscribe

आज काल सर्व जण हेल्थ कॉन्शियस (Health Consciousness) झाले आहेत. तुम्ही आम्ही स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जीमला जातात. व्यायामामुळे (Exercise) आपले हाडे आणि स्नायू हे मजबूत होतात. व्यायाम करण्याला आपण जेवढे महत्त्व देतो, तेवढेच महत्त्व आहारा देखील देणे गरजेचे आहे. यामुळे व्यायाम करण्यापूर्वी ( before workout) आणि व्यायामानंतर (Post Workout) काय घावे हे माहिती असणे तितकेच महत्त्वाचे आहे. यामुळे आपण आज या गोष्टी माहिती करणार आहोत.

जीम करण्यापूर्वी काय खावे, असा प्रश्न तुम्हा आम्हला पडलेला असतो कारण, व्यायाम करताना आपण जास्त ताकद लावतो. यामुळे आपण व्यायाम करण्यापूर्वी पौष्टीक आहार घेणे महत्त्वाचे आहे. कोणते पदार्थ खावे, जेणे करून तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि यामुळे तुम्ही एकदम फिट राहाल.

- Advertisement -

नाश्ता – व्यायाम करण्यापूर्वी एक ते दोन तास आधी हलका नाश्ता करावा. ज्यात दही, सुपरफूड, फळे इत्यादी पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे.

- Advertisement -

हायड्रेशन – व्यायाम करण्यापूर्वी योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

कार्बोहाइड्रेट्स – व्यायामापूर्वी कार्बोहाइड्रेट्स खाल्ल्याने ऊर्जा मिळते. यासाठी तुम्ही साखर, तांदूळ, ब्राऊन ब्रेड, केळी, तृणधान्य इत्यादी सेवन करावे.

प्रोटीन – चीज, दही, शेंगदाणे, अंडी इत्यादी हलके प्रथिनयुक्त पदार्थाचे सेवण करणे हे तुमच्या शरीराच्या विकासासाठी फायदेशीर ठरतील.

व्यायाम केल्यानंतर काय खावे

प्रोटीन शेक – व्यायाम केल्यानंतर प्रोटीन शेक पिणे हा देखील चांगला पर्याय आहे. कारण, व्यायामानंतर शरीरातील झिज भरून निघण्यासाठी मदत होते. यासाठी स्नायूंच्या वाढीस चालना मिळते. यासाठी तुम्ही दूध, प्रोटीन पावडर, फळे, नट्स आदी खाऊ शकता

भाज्या आणि फळे – भाज्या आणि फळे खाल्ल्याने तुम्हाला पोषकतत्वे मिळतात. यामुळे खनिजे आणि फायबरचे प्रमाण वाढते. तुम्हाला जी आवडीची फळे कलिंगड, काकडी, गाजर, टोमॅटो, पालक कोबी अने प्रकारच्या फळ आणि भाज्या करतात.

अंडी – अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिन असतात. शरीराची वाढ आणि विकासाला चालना देण्यासाठी व्यायामानंतर खाऊ शकतो.


 

हेही वाचा – Period Panty चा वापर करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

- Advertisment -

Manini