घरमहाराष्ट्रनाशिकMNS Vardhapan Din: राजकीयदृष्ट्या सोशल मीडियाचा वापर करा; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

MNS Vardhapan Din: राजकीयदृष्ट्या सोशल मीडियाचा वापर करा; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

Subscribe

नाशिक:मनसेचा आज 18 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त नाशिकमध्ये अधिवेशन घेण्यात येत आहे. दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसेचं अधिवेशन सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना, सोशल मीडियाचा वापर राजकीयदृष्ट्या करा. आपल्या पक्षाला कसा फायदा होईल, याचा विचार करून या माध्यमाचा वापर योग्यरितीने करा, असं राज ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. (MNS Vardhapan Din Use social media politically Raj Thackeray s appeal to workers)

राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 18 वर्षे पूर्ण झालीत. यंदा नाशिकमध्ये हा वर्धापन दिन साजरा करत आहोत. यापुढे वर्धापन दिन हा महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांमध्ये साजरा करण्याचे ठरवले आहे.

- Advertisement -

मनसेला यश मिळवून देणारच

मागच्या 18 वर्षांतील मनसेच्या प्रवासाबाबत बोलताना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी उपस्थितांना सांगितलं की, कोणताही पक्ष हा एकाएकी मोठा होत नाही. भाजपा मोदींनी मोठा केलेला पक्ष नाही. तो त्या पक्षासाठी खस्ता खाल्लेल्या कार्यकर्त्यांमुळे आहे.

1952 मध्ये जनसंघाची स्थापना झाली. त्यानंतर आता भाजपाला पूर्ण बहुमत मिळाले आहे.1980 मध्ये जनसंघाचे नाव बदलून भारतीय जनता पार्टी करण्यात आले, त्यानंतर अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात पहिले सरकार 13 दिवसांचे आले. मी तुम्हाला यश मिळवून देणार म्हणजे देणार, हा माझा शब्द आहे. गेल्या 18 वर्षांत तुम्ही जी साथ दिली, माझ्या उतरत्या काळात साथ दिली तुम्हाला यश मिळवून देणार.

- Advertisement -

राज ठाकरे म्हणाले की, मला ना आपला पक्ष मोठा होत असताना, माझ्या कडेवर माझीच लेकरं खेळवायची आहेत. फक्त तुमचा संयम हवा आहे. सध्या महाराष्ट्रात जी स्थिती आहे. हा त्याच्याकडे, तो याच्याकडे हे मला नकोय.

शरद पवारांची राष्ट्रवादी म्हणजे ‘मोळी’

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, त्यांच्या पक्षाला मी पक्ष म्हणत नाही. निवडून येणाऱ्या लोकांची ती एक मोळी आहे. असं म्हणत त्यांनी टीकास्त्र डागलं आहे.

(हेही वाचा: MNS Vardhapan Din: राजकीयदृष्ट्या सोशल मीडियाचा वापर करा; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -