घरपालघरपालघर जिल्हा हादरला,गावात फिरणार्या माथेफिरूचे भयंकर कृत्य

पालघर जिल्हा हादरला,गावात फिरणार्या माथेफिरूचे भयंकर कृत्य

Subscribe

अखेर आरोपीला रात्री सव्वा अकराच्या सुमारास करण खाडीमधील पाण्यात लपून बसलेला असताना अटक करण्यात आली.

बोईसर : बोईसरजवळील कुडण हे गाव.गावात नेहमीप्रमाणे एक रात्र होती. अशातच क्रूर आणि गंभीर घटना घडेल याची कोणालाही कल्पना नव्हती.घड्याळात रात्री ९.३० वाजले.तोच गावातील एका माथेफिरूने दोन वृद्धांवर कुर्‍हाडी सदृश शस्त्राने हल्ला चढवला.या क्रूर हल्ल्यात दोन्ही ज्येष्ठ इसमांचा जागीत मृत्यू झाला.मृतांची नावे भीमराव पाटील (वय ७२) मुकुंद पाटील (वय ८०) अशी आहेत. दोन्ही गावातील स्थानिक रहिवासी असून एकमेकांचे भाऊ आहेत. पहिला खून केल्याचे घरातील भावाने पाहिल्यानंतर आरोपीने दार तोडून दुसर्‍या भावाचा खून केला.त्यानंतर या क्रूर आरोपीने बाजूला राहणार्‍या ग्रामस्थांच्या घरावर हल्ला केला. त्यावेळी घरातील रुपेश पाटील आणि त्यांचे वडील यांनी पुढचे दार बंद करून मागच्या दाराने येऊन बेसावध असणार्‍या या मारेकर्‍याच्या हातातील कुर्‍हाड हातातून खेचून घेतली. त्यानंतर आरोपीने गावाच्या बाहेर असणार्‍या मोकळ्या जागेत पलायन केले. हा आरोपी झुडपात पसार झाल्याने त्याचा शोध स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घेतला. अखेर आरोपीला रात्री सव्वा अकराच्या सुमारास करण खाडीमधील पाण्यात लपून बसलेला असताना अटक करण्यात आली.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार खून करणारी व्यक्ती वेडसर असून दोन दिवसांपासून तो गावात फिरत होता. स्थानिकांच्या माहितीनुसार, तो इसम मानसिकरित्या विक्षिप्त होता, त्यामुळे कोणी त्याची दखल घेतली, त्याच्याकडे लक्षही दिले नाही. पण गुरूवारी रात्री गावात खळबळजनक प्रकार घडला. रात्री साडेनऊच्या सुमारास त्या युवकाने एका वृद्ध व्यक्तीवर कुर्‍हाडीने वार करून त्याची हत्या केली आणि तो त्याच्या मृतदेहाजवळच बसून राहिला. त्या मृत इसमाचा भाऊ त्याला शोधायला तिकडे आला असता, आरोपीने त्याच्यावरही हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या त्या इसमाचादेखील घटनास्थळीच मृत्यू झाला.

- Advertisement -

तारापूर डबल मर्डर केसमधील आरोपी कुडण गावच्या जवळील तलावातील दलदलिच्या परिसरात पाण्यात लपून बसलेला असताना पालघर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी सध्या इतर काहीही माहीती देत नाही . पुढील तपास करत आहोत . कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये .

– बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक ,पालघर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -