घरमुंबईAzad Maidan : संगणक परिचालकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई सोडणार नाही -...

Azad Maidan : संगणक परिचालकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई सोडणार नाही – सिद्धेश्वर मुंडे

Subscribe

मुंबई : मागील 12 वर्षापासून राज्यातील सुमारे 29 हजार ग्रामपंचायतमध्ये अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करून ग्रामीण भागातील सुमारे 7 कोटी जनतेला ऑनलाईन व ऑफलाईन सेवा देणाऱ्या संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे, 20 हजार रुपये मासिक मानधनवाढ देणे या दोन प्रमुख मागण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मागील 21 फेब्रुवारी पासून शांततेच्या मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून आज आंदोलनाचा 10 वा दिवस आहे व अरर्भसंकल्पाचा शेवटचा दिवस आहे. काल 29 रोजी मुख्यमंत्री शिंदे यांनी लावलेली बैठक रद्द केल्याने संगणक परिचालकांमध्ये असंतोष पसरला असल्याने वर्षा बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा व मुंबई न सोडण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचे संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले. (Azad Maidan Will not leave Mumbai until the demands of computer operators are accepted Siddeshwar Munde)

हेही वाचा – LPG Price Hike : मार्चच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ

- Advertisement -

राज्यातील सुमारे 29 हजार ग्रामपंचायत मध्ये 20 हजार संगणक परिचालक कार्यरत आहेत. संगणक परिचालकांना या महागाईच्या काळात अतिशय तुटपुंजे असे केवळ 7 हजार रुपये मासिक मानधन मिळते. या मानधनावर संगणक परिचालक स्वतःचे कुटुंब कसे चालवणार? असा प्रश्न संगणक परिचालकांसमोर आहे. 12 वर्षात प्रामाणिकपणे केलेल्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाने यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायतच्या सुधारित आकृतीबंधात पदनिर्मिती करून कर्मचारी दर्जा व किमान वेतन द्यावे ही प्रमुख मागणी असून या मागणीला वेळ लागत असेल तर 20 हजार रुपये मासिक मानधनवाढ करावी, ही दुसरी मागणी ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा – Maharashtra Politics : “मी त्यांच्या घरचं खात नाही…” भुसेंसोबतच्या वादावर महेंद्र थोरवे थेटच म्हणाले

- Advertisement -

या मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मागील 21 फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा 10 वा दिवस असून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. मात्र गुरुवारी 29 फेब्रुवारी रोजी म्हणजेच आंदोलनाच्या 9 व्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 3.45 वाजता ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या प्रश्नावर विधानभवनात बैठकीचे आयोजन करण्यात होते. परंतु ती बैठक झाली नसल्यामुळे संगणक परिचालक अस्वस्थ झाले आहेत. तसेच आज 1 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत असल्याने त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर बैठक लावून संगणक परिचालकांचा निर्णय द्यावा, अन्यथा वर्षा बंगल्यासमोर आंदोलन करण्यात येणार आणि मागणी मान्य होईपर्यंत मुंबईत सोडणार नाही, अशा इशारा संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -