घरमनोरंजनदीपिकानंतर आता 'जवान'मध्ये 'या' बॉलिवूड अभिनेत्रीची होणार एन्ट्री

दीपिकानंतर आता ‘जवान’मध्ये ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची होणार एन्ट्री

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आगामी जवान चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाबाबत सध्या सतत नवनवीन अपडेट समोर येत असतात. या चित्रपटामध्ये टॉलिवूड अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील दिसणार असल्याची माहिती समोर आली होती. अशातच, आता या चित्रपटात बॉलिवूडमधील आणखी एक अभिनेत्री दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.

‘जवान’मध्ये ‘या’ अभिनेत्रीची होणार एन्ट्री

समोर आलेल्या माहितीनुसार, ‘जवान’ चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी कॅमियो करताना दिसणार आहे. या चित्रपटात कियारा एका गाण्यामध्ये दिसणार आहे. हे गाणं या चित्रपटासाठी खूप महत्त्वाच मानलं जात आहे. कियाराच्या एन्ट्रीने तिचे चाहते देखील खूश झाले आहेत. यामुळे प्रेक्षकांची अधिकच उत्सुकता वाढलेली आहे. याआधी अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील या चित्रपटात कॅमियो करताना दिसणार असल्याची माहिती समोर आली होती.

- Advertisement -

‘जवान’ तेलुगू , तमिळ आणि हिंदी भाषेत होणार प्रदर्शित

या चित्रपटाचं दिग्दर्शन अटली कुमार करत आहे. याची निर्मिती शाहरुखची प्रॉडक्शन कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि गौरी खान यांनी केली आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

 


हेही वाचा :

चर्चेत राहण्यासाठी स्टंट करतेय… फोटोग्राफरची चप्पल उचलल्याने आलिया झाली ट्रोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -