Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthBack Pain : पाठदुखीने त्रस्त आहात ? 'या' आसनाने मिळेल फायदा

Back Pain : पाठदुखीने त्रस्त आहात ? ‘या’ आसनाने मिळेल फायदा

Subscribe

बहुतेक लोकांना पाठदुखीची समस्या भेडसावत आहे आणि प्रत्येक ऋतूमध्ये ही वेदना त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देते. झोपेतून उठल्यानंतर अनेक वेळा पाठ आणि कंबरेत तीव्र वेदना होतात. त्यामुळे योगासने आराम देण्यास मदत करतात. पाठदुखीचा त्रास होत असेल तर ही योगासने फायदेशीर ठरतील. योगासनांमुळे शरीरातील वेदना कमी होतात आणि सुस्ती दूर होते. चला तर जाणून घेऊया असे योगासन, जे पाठ आणि शरीराच्या दुखण्यासोबतच सुस्तीपासून मुक्त होण्यास मदत करेल.

भुजंगासन 

भुजंगासन के 10 फायदे और योगासन विधि - Bhujangasana (Cobra Pose) Benefits  and Steps in Hindi

- Advertisement -

हे आसन आपल्या आरोग्याासाठी फायदेशीर आहे. हे आसन केल्याने पाठदुखीसह हातांचे स्नायूही मजबूत होतात. त्यासोबतच ही आसने कंबर आणि पोटाची चरबी कमी करण्यास साह्यभूत ठरतात.

पश्चिमोत्तानासन

पश्चिमोत्तानासन: अर्थ, लाभ, चरण और अभ्यास युक्तियाँ

- Advertisement -

पश्चिमोत्तानासन केल्याने खांदा आणि मणका ताणला जातो. त्यामुळे कंबरदुखीपासून आराम मिळतो. यासोबतच हे आसन डोकेदुखी आणि सुस्ती दूर करते. उच्च रक्तदाब, निद्रानाश बरा करण्यासोबतच पश्चिमोत्तनासन केल्याने मन शांत राहते आणि तणाव दूर राहतो. हे करण्यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर बसा. दोन्ही पाय बाहेरच्या दिशेने पुढे करा. श्वास घ्या आणि हळू हळू हात वर करुन हळू हळू खाली वाका आणि संपूर्ण पायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा.

बाल मुद्रा

Child's Pose: How To Find Soothing Shoulder Relief - YogaUOnline

हा एक अतिशय सामान्य योगासनाचा प्रकार आहे. हे आसन केल्यामुळे पाठीच्या खालच्या भागाचे स्नायू हळूहळू पसरतात. जे दुखत असताना आकुंचन पावलेले असतात. आसन करण्यासाठी आपले गुडघे आणि तळहात अश्या पोझमध्ये ठेवावे जसे लहान मूल पाठीवर बसलेले आहे. तळवे जमिनीवर ठेवून, दीर्घ श्वास घ्या आणि हातांच्या साहाय्याने ते समोर पसरवा. आणि नितंब मागे घेऊन टाचांवर बसा.

गुडघा ते छाती ताणणे

Yoga Mantra: ही ३ योगासने केल्याने वाढवणार नाही शरीराचे वजन, पाहा कसे  करावे-yoga mantra 3 yogasanas for body weight management know how to do it  ,लाइफस्टाइल बातम्या

या आसनामुळे पाठीचे स्नायू आकुंचन पावतात. गुडघ्यापासून छातीपर्यंत ताणल्याने पाठीच्या खालच्या दुखण्यापासून निश्चितच आराम मिळतो.

पाठदुखी कमी करण्यासाठी व्यायामाव्यतिरिक्त तुम्ही इतरही अनेक गोष्टी करू शकता : 

  • बसताना पाठ ताठ करून बसा.
  • तुम्ही लठ्ठ असाल तर वजन कमी करा.
  • तुम्हाला पाठीचे जुने दुखणे असेल तर जड वस्तू उचलणे टाळा.
  • नियमित व्यायाम करा.
  • दररोज किमान 7 ते 8 तास झोप घ्या.
  • तणाव व्यवस्थापित करा.
  • तुम्हाला जास्त वेळ बसून काम करावे लागत असेल तर वारंवार ब्रेक घ्या. जागेवरून उठा.

सकस आहाराचा समावेश करा

शाकाहार इतिहास देखें अर्थ और सामग्री - hmoob.in

पाठदुखीसह अन्य दुखणे मुळापासून नष्ट करण्यासाठी आपल्या रोजच्या जेवणात सकस आहाराचा समावशे करणे गरजेचे आहे. व्हिटॅमिन डी 3, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम, फॉस्फरस, हिरव्या भाज्या खाल्ल्याने पाठदुखीमध्ये आराम मिळतो. जर तुम्ही मांसाहार करू शकत असाल तर आहारात माशांचा नक्कीच समावेश करा. यातून आपली हाडे मजबूत होत असतात.

- Advertisment -

Manini