घरमहाराष्ट्रSupriya Sule : सुप्रीम कोर्टाचे सुप्रिया सुळेंनी मानले आभार, म्हणाल्या...

Supriya Sule : सुप्रीम कोर्टाचे सुप्रिया सुळेंनी मानले आभार, म्हणाल्या…

Subscribe

सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारल्यानंतर सुप्रिया सुळेंनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. तर मंगळवारी होणाऱ्या सुनावणीची वाट पाहून पुढे बोलणे योग्य ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

पुणे : सुप्रीम कोर्टात काल गुरुवारी (ता. 14 मार्च) शरद पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने अजित पवार गटाला खडेबोल सुनावले आहेत. शरद पवार यांचा फोटो आणि त्यांचे नाव बॅनर्सवर लावू नका आणि असे पुन्हा होणार नाही, असे लेखी लिहून देण्याचे आदेश कोर्टाकडून अजित पवार गटाला देण्यात आले आहेत. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहेत. (Supriya Sule thanked the Supreme Court)

हेही वाचा… Supreme Court : शरद पवारांचे फोटो वापरणे थांबवा, अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टाने फटकारले

- Advertisement -

खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी आज (ता. 15 मार्च) संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, जे शरद पवार यांचा फोटो वापरतात, ते स्वतः एका वेगळ्या विचारामध्ये काम करू इच्छितात, जर ते एका वेगळ्या विचारासाठी काम करत असतील आणि त्यासाठी ते शरद पवारांना सोडून गेले असतील तर त्यांनी पवारांचा फोटो वापरायचा की नाही, याबाबतचा निर्णय आता आलेला आहे. तर आणखी एका गोष्टीसाठी सुप्रिम कोर्टाचे आभार मानते. कारण, त्यांनी वक्तव्य करत म्हटले की, निवडणूक आले की तुम्हाला शरद पवार आठवतात आणि निवडणुका संपल्या की तुम्ही त्यांना सोडता. असे मी नाही कर सुप्रीम कोर्टाने आपल्या ऑर्डरमध्ये म्हटले आहे. पण आता मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी पार पडणार आहे, ज्यानंतर या प्रकरणी बोलणे योग्य ठरले, असेही सुप्रिया सुळे यांच्याकडून सांगण्यात आले.

सुप्रिम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारले…

- Advertisement -

गुरुवार, 14 मार्चला पार पडलेल्या सुनावणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाकडून वरीष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अद्यापही शरद पवार यांच्या फोटोचा वापर केला जात असल्याची माहिती दिली. अधिकृत मान्यता देण्यात आलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ या चिन्हाचा वापर करत आहे. हे चिन्ह गेल्या कित्येक वर्षांपासून शरद पवारांशीच संबंधित राहिले आहे. शिवाय, शरद पवारांचं नाव आणि फोटोही अजित पवार गटाकडून प्रचाराच्या फलकांवर वापरले जात आहेत, असे वरीष्ठ वकील सिंघवी यांच्याकडून युक्तीवाद करताना सांगण्यात आले. याच मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खडेबोल सुनावले आणि यापुढे शरद पवार यांचे नाव आणि फोटो न वापरण्याच्या सूचना केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -