घरमनोरंजनदेसी गर्ल प्रियंका लेकीसोबत एअरपोर्टवर स्पॉट

देसी गर्ल प्रियंका लेकीसोबत एअरपोर्टवर स्पॉट

Subscribe

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा प्रोफेशनल आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अनेकदा प्रियंकाचे तिच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अशातच, आता प्रियंका तिच्या लेकीसोबत भारतात पोहोचली आहे. नुकत्याच काही तासांपूर्वी प्रियंका मुलीसोबत भारतात येणार असल्याची माहिती तिने शेअर केली होती. दरम्यान, आता भारतात पोहोचल्यावर प्रियंका आणि मालती मेरीला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रियंका लेकीसोबत एअरपोर्टवर स्पॉट

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

मुंबईत पोहोचल्यानंतर प्रियंका आणि मालती मेरीला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी दोघींना पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. यावेळी प्रियंकाने ब्लॅक क्रॉप टॉप आणि ट्राउजर घातली होती. तर मालतीने व्हाइट आणि ग्रीन कलरचे शॉर्ट चेक्स फ्रॉक आणि पँट घातली होती. यावेळी प्रियंकाने मालतीला उचलून घेतले होते. पापाराझींना पाहताच मालतीने गोड स्माईल देखील दिली.

- Advertisement -

‘या’ चित्रपटात दिसणार प्रियंका चोप्रा

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील दिसणार आहेत. तसेच प्रियंका लवकरच आगामी हॉलिवूड चित्रपट ‘द ब्लफ’ मध्ये दिसणार आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा :

45 महिने होऊनही…’ सुशांतच्या बहिणीचं पीएम मोदींना आवाहन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -