घरमनोरंजन‘फँड्री’तील शालू-जब्याचं जमलं? फोटोचं कॅप्शन चर्चेत

‘फँड्री’तील शालू-जब्याचं जमलं? फोटोचं कॅप्शन चर्चेत

Subscribe

नागराज मंजुळे यांचा पहिला सिनेमा फँड्री. या सिनेमानं राष्ट्रीय पुरस्कारावर मजल मारली. जाती भेदावर आधारित या सिनेमाला प्रेक्षकांच्या डोक्यावर घेतलं. 11 वर्षांपूर्वी आलेल्या फँड्री चित्रपटातील शालू-जब्याची जोडी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सिनेमात जब्याची भूमिका अभिनेता सोमनाथ अवघडे यानं साकारली होती. तर शालूची भूमिका अभिनेत्री राजेश्वरी खरात हिनं साकारली. दोघांच्या नैसर्गिक अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. फँड्रीनंतर ही जोडी फार कुठे दिसली नाही. पण दोघांनी अनेक लहान मोठ्या प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केलं आहे.

अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असते. राजेश्वरीचे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. फँड्री नंतर राजेश्वरी मोठ्या पडद्यावर दिसली नाही मात्र सोशल मीडियावर तिनं तिची कमालीची फॅन फॉलोविंग तयार केली. राजेश्वरीने नुकताच तिचा आणि सोमनाथचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

- Advertisement -

आता तिने जब्या म्हणजेच सोमनाथबरोबरचा एक फोटो शेअर करत ‘कशी काय मग जोडी’ असं कॅप्शन दिलं आहे. त्याचप्रमाणे, शालू, जब्या, फॉरेव्हर असे हॅशटॅग देखील शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. राजश्रीनं शेअर केलेल्या या फोटोनंतर दोघांमध्ये नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. अनेकांनी दोघांच्या नात्याबद्दल चर्चा करायला सुरुवात केली आहे.

 राजेश्वरीने शेअर केलेल्या फोटोवर नेटकरी खूप कमेंट्स करत आहेत. राजश्री आणि सोमनाथ यांचा फोटो पाहून एका चाहत्यानं लिहिलंय, “नागराजने बनादी जोडी”, तर दुसऱ्या चाहत्यानं लिहिलंय, “काळी चिमणी गावली मला…” तर आणखी एका चाहत्यानं लिहिलंय, “अय झब्या..!! ती शालू तुला पटली का रं”. तर अजून एकाने ‘तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला’ अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.

- Advertisement -

shalu jabya comments

राजेश्वरीने केलेला हा फोटो खूप चर्चेत आहे. दोघेही या फोटोत खूप छान दिसत आहेत. राजेश्वरीने शेअर केलेल्या फोटोने चाहत्यांना परत एकदा फँड्री सिनेमातील शालू-जब्याची जोडी आठवण करून दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -