घरदेश-विदेशAmit Shah : उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, CAA बाबत शहांचे...

Amit Shah : उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, CAA बाबत शहांचे आव्हान

Subscribe

CAAबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ANI ला दिलेल्या विशेष मुलाखतीच्या माध्यमातून शहांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.

नवी दिल्ली : सोमवारी (ता. 11 मार्च) देशभरात सीएए लागू करण्यात आला आहे. CAA म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा कधीच मागे घेतला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून घेण्यात आली आहे. याला देशातील नागरिकांनी समर्थन केले असले तरी काहींनी याला कडाडून विरोध केला आहे. याच कायद्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका वृत्त संस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीच्या माध्यमातून शहांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. (Uddhav Thackeray should clarify his position, Amit Shah challenge on CAA)

हेही वाचा…Amit Shah : CAA कधीच मागे घेतले जाणार नाही, अमित शहांची स्पष्ट भूमिका; विरोधकांना सुनावले खडेबोल

- Advertisement -

उद्धव ठाकरे असे म्हणतात की तुमचे अपयश झाकण्यासाठी तुम्ही हा कायदा आणला आहे. याबाबत बोलताना अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत म्हटले की, मी उद्धव ठाकरेंना विचारु इच्छितो की, तुम्हाला हा कायदा हवा की नको हे स्पष्ट करा. उद्धव ठाकरे हे सांगू इच्छितात की कायदा नको? त्यामुळे हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन शरणार्थींना नागरिकत्व देणारा कायदा यायला हवा की नको, हे उद्धव ठाकरेंनी देशाच्या आणि राज्याच्या जनतेसमोर येऊन स्पष्ट करावे, असे आव्हान मी त्यांना करतो. त्यामुळे त्यांनी याबाबत राजकारण करु नये, मी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान करतो की त्यांनी याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी.

उद्धव ठाकरे मुस्लिमांचे लांगुलचालन करत आहेत. मते मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे हे सगळं करत आहेत. सध्याच्या घडीला मते मिळवण्यासाठी हे सर्व काही चालले आहे. आमची पहिल्या दिवसापासून ही भूमिका आहे की देशाची फाळणी झाल्यानंतर जे लोक भारतात शरणार्थी म्हणून आले आहेत, त्यांना नागरिकत्व मिळाले पाहिजे, अशी भूमिकाही अमित शहा यांच्याकडून स्पष्ट करण्यात आली.

- Advertisement -

ओवैसी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यासह सर्व विरोधी पक्ष यावर राजकारण करत आहेत. सीएए हा आताच, लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी का लावला असा प्रश्न विचारत आहेत. पण भाजपाने 2019 मध्ये आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते की ते CAA कायदा लागू केला जाईल, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील निर्वासितांना नागरिकत्व देण्यात येईल, असे अमित शहा यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -