Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जालन्यातील लाठीमारच्या निषेधार्थ औरंगाबादमधील 'या' गावात आजपासून उपोषण

जालन्यातील लाठीमारच्या निषेधार्थ औरंगाबादमधील ‘या’ गावात आजपासून उपोषण

Subscribe

औरंगाबाद : जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांना  पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमारचे औरंगाबादमध्ये पडसाद पडले आहे. यात गंगापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर आजपासून तीन दिवस साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तीन दिवसांच्या आत मागण्या मान्य न झाल्यास त्याच ठिकाणी बेमुदत उपोषण हे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या आंदोलनात गावातील तरुण, वृद्ध आणि महिला,लहान मुले सहभागी होताना पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील तीन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास साखळी उपोषण थांबून त्याच ठिकाणी अमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा देखील गावकऱ्यांनी दिला आहे.

 आंदोलकांच्या ‘या’ आहेत मागण्या 

- Advertisement -

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन करत असलेल्या मराठा बांधवांवर पोलिसांनी अमानुषपणे मारहाण करून जखमी केले. त्याचा गंगापूर सकल मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात येऊन याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत. तसेच, आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर सक्तीच्या रजेवर पाठवण्याऐवजी तात्काळ निलंबणाची कारवाई करण्यात यावी.

हेही वाचा – One Nation On Election हा एक फ्रॉड; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

- Advertisement -

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे. त्यासाठी केंद्रात आणि राज्यात भाजप आघाडीचेच सरकार असल्याने संसदेत अध्यादेश काढून निर्णय घेण्यात यावा. सर्वोच्च न्यायालय प्रलंबित असल्याचे कारण सांगून समाजाची फसवणूक करू नये. मराठा समाजातील युवकांवर गंगापूर तालुक्यातील कायगाव आंदोलनासह, आंतरवली सराटी आणि राज्यात इतर ठिकाणी दाखल झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

- Advertisment -