घरमहाराष्ट्रमराठा आरक्षण हाच एक उपचार - मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षण हाच एक उपचार – मनोज जरांगे पाटील

Subscribe

जालना : मराठा आरक्षण हाच उपचार आहे आणि आरक्षणाशिवाय दुसरे काहीच नाही, असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 40 दिवसांची मुदत दिली होती. यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली असून आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दोन घोट पाणी पिऊन आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक गावांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. त्याचबरोबर राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या तपासणीसाठी शासनाचे वैद्यकीय पथक उपोषणस्थळी आले होते. पण मनोज जरांगे पाटील यांनी तपासणीस नकार दिला आणि पथकाला परत पाठवले. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले, “राज्य सरकारकडून आता फक्त आरक्षण घेणार, दुसरे काही नको. माझ्यासाठी आरक्षण हाच एक उपाचर आहे, असे म्हणत त्यांनी शासनाचे वैद्यकीय पथकाला परतवून लावले.”

- Advertisement -

हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी उपोषण पुढे सुरूच ठेवावे, पण त्यांनी…; जरांगे पाटलांकडून संभाजीराजेंची विनंती मान्य

छत्रपती संभाजीराजेंच्या विनंतीनंतर दोन घोट पाणी

- Advertisement -

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात करताना पाणी पिणार नाही, असे जाहीर केले होते. पण छत्रपती संभाजी राजे यांनी बुधवारी (25 ऑक्टोबर) छत्रपती संभाजीराजे यांच्या विनंतीनंतर पाण्याचे दोन घोट घेण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला. छत्रपती संभाजी राजे म्हणाले, “उपोषणाच्यावेळी मी चार दिवस पाणी प्यायलो नसल्यामुळे मी हतबल झालो होतो. त्यामुळेच मला जरांगे पाटलांची फार चिंता आहे, काळजी वाटते. छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून माझीही काही जबाबदारी आहे. जो समाजासाठी लढतो, जेव्हा समाज अडचणीत असताना लढतो, त्याला ताकद देण्याचे काम छत्रपती घराण्याचे असते. म्हणूनच मी आज जरांगे पाटलांसाठी धावपळत याठिकाणी आलो. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मनापासून आम्हाला तुमची काळजी आहे. त्यामुळे एकच विनंती आहे. पाणी तरी प्या.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -