घरमहाराष्ट्रटेंभू योजनेवरून रोहित पवार आणि संजयकाका पाटील आमने-सामने; सांगलीचे राजकारण तापले

टेंभू योजनेवरून रोहित पवार आणि संजयकाका पाटील आमने-सामने; सांगलीचे राजकारण तापले

Subscribe

मुंबई : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ही म्हण सांगलीच्या सध्याच्या राजकारणावर साजेल अशी आहे. कारण शरद पवार गटाच्या आमदार सुमन आर. आर. पाटील यांनी टेंभू उपसा सिंचन योजनेमध्ये 17 गावांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी आजपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे. सुमन पाटील यांच्या उपोषणावर भाजपचे खासदार संजयकाका पाटील टीका केली. संजय काका पाटील आणि रोहित पाटील यांच्यातील आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच शिंदे गटाचे खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट टेंभू योजनेच्या विस्तारासाठी मंजूरी आणली. यामुळे टेंभू पाणी योजनेवरून सांगलीचे राजकारण चांगलेच तापले आहे.

सुमन पाटील यांच्यावर संजयकाका पाटील टीका करताना म्हणाले, सुमन पाटील या मुलाच्या प्रमा पोटी आंधळ्या झाल्या असून त्यांचे उपोषण म्हणजे नोटंकी आहे.” विरोधकांच्या टीकेवर रोहित पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, “टेंभू उपसा सिंचन योजनेमध्ये सावळजसह तासगाव तालुक्यातील 8 गावे आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 9 गावांचा समावेश करण्यात यावा. यासाठी सुमन पाटील उपोषणाला बसल्या आहेत. जोपर्यंत आबा होते, तोपर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्याला दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न केला. पण आता टेंभू योजनेत द्वितीय सुप्रमा मंजूर झाला असतानाही काही गावे पाणी उपलब्ध नसल्याने शिल्लक होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जयंत पाटील यांच्याकडे पाठपुराव केला होता. लवादाच्या बैठकीमध्ये या भागाला पाणी आरक्षित करून घेतले. पण त्याचा प्रस्ताव तयार असताना सुद्धा वेळ का लागतोय?, हा सवाल उपोषणाच्या माध्यमातून राज्य सरकारला करणार आहोत. या भागाकडे सरकारकडून दुर्लभ केल जाते का? आणि उपोषणातून स्थानिक लोपप्रतिनिधी त्यांचा राग व्यक्त करत आहेत,” असे रोहित पाटील म्हटले.

- Advertisement -

काय आहे प्रकरण ?

सातारा, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातील सात तालुक्यात 210 गावातील लाभ क्षेत्राला पाणी देण्यासाठी टेंभू योजना तयार करण्यात आले आहे. या योजनेतील कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यातील 17 गावांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी सुमन पाटील सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे.

हेही वाचा – काँग्रेसच्या दावणीत गुलामी करणाऱ्या खोट्या वाघांकडून…; चित्रा वाघ यांचे ठाकरेंवर टीकास्त्र

- Advertisement -

…कामे करण्याची वृत्ती आबांच्या कुटुंबीयांमध्ये नाही

रोहित पाटील पुढे म्हणाले, “सुमन पाटील आणि रोहित पाटीलवर टीका करताना विरोधकांनी म्हटले, पाणी विषयावर राजकारण करायचे नाही आणि विरोधकांवर बोलायचे देखील नाही, असे आम्ही ठरविले होते. पण काही लोकांनी आबांपासून इतिहास काढू लागले आहेत. मुलाचे भविष्य अंधारात जाऊ नये, म्हणून सुमन पाटील उपोषण करत आहेत आणि यांचे उपोषण म्हणजे नोटंकी आहे, असेही काही लोक बोलत आहेत. बाबाच्या कुटुंबाने त्यांच्या पश्चात कसे काम केले. हे लोकांनी बघितले असून माझे भविष्य अंधारा आहे की नाही. हा निर्णय सर्वसामान्य मतदार घेतील. निवडणुका जवळ आल्या की कामे करण्याची वृत्ती आबांच्या कुटुंबीयांमध्ये नाही.”

हेही वाचा – ऋषी सुनक भारतीय वंशांचे ‘प्राऊड हिंदू’ आहेत, पण… ठाकरे गटाची जोरदार टीका

मुख्यमंत्र्यांनी टेंभू विस्तारी योजनेसंदर्भात म्हणाले…

मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत टेंभू विस्तारीत योजनेसाठी ८ टी.एम.सी. पाणी उपलब्ध करुन देण्यास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे आणि यासाठी शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी पाठपुरावा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये काय म्हटले, “सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजलनियोजनासह बोंडारवाडी प्रकल्पाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यासंदर्भात ३० सप्टेंबर रोजी सुधारित शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. याच शासन निर्णयाची प्रत यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आटपाडी खानापूर मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांना काल माझ्या वर्षा निवासस्थानी भेटून सुपूर्द करण्यात आली. तसेच त्यांची दुसरी महत्त्वाची मागणी असलेल्या टेंभू योजनेच्या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्तावही लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल, असेही आमदार बाबर यांना सांगितले.

खानापूर,आटपाडी व विसापूर सर्कल तासगाव तालुक्यातील ३४ गावातील शेतकऱ्यांना टेंभू योजनेचे हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आमदार बाबर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. टेंभू विस्तारीत योजनेसाठी ८ टी.एम.सी. पाणी उपलब्ध करुन देण्यास राज्य शासनाने मंजूरी दिल्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -