घरमहाराष्ट्रनाशिकPM Modi यांच्या नाशिक दौऱ्यात असंवेदनशील कृत्य; काळाराम मंदिराजवळची घरे कपड्याने झाकली

PM Modi यांच्या नाशिक दौऱ्यात असंवेदनशील कृत्य; काळाराम मंदिराजवळची घरे कपड्याने झाकली

Subscribe

पंतप्रधान मोदी काळाराम मंदिरात जाताना त्यांना रस्त्यालगतच्या चाळी दिसू नये म्हणून त्यांची घरे पांढरे कापडे टाकून झाकण्यात आली होती

नाशिक : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी (12 जानेवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन आणि रोड शो आयोजित करण्यात आला होता. यानंतर पंतप्रधान मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजा व महाआरती केली. पण काळाराम मंदिराजवळ असलेल्या चाळीत राहणाऱ्या लोकांचे पंतप्रधान मोदींना दर्शन होऊ नये. यासाठी चाळीला पांढऱ्या कपड्याने झाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या असंवेदशनशील कृत्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान अनेक विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौरा हा फक्त चार तासाचा होता. पण यासाठी सरकारकडून कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आल्याचे दिसून आले. पंतप्रधान मोदी काळाराम मंदिरात जाताना त्यांना रस्त्यालगतच्या चाळी दिसू नये म्हणून त्यांची घरे पांढरे कापडे टाकून झाकण्यात आली होती. एका बाजूला पंतप्रधान गरिबी निर्मूलनाची भाषा करतात, तर दुसऱ्या बाजूनला झोपड्यांवर पांढरे कापड टाकून लोकांची घरे झाकली. यामुळे यंत्रणा गरीबबद्दल किती असंवेदनशील आहे हे स्पष्ट दिसू दिसले.

- Advertisement -

हेही वाचा – Milind Deora यांच्या राजीनाम्यावर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया, म्हणाले – “काँग्रेसने…”

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान झोपडपट्टीसमोर भिंत बांधल्या

यापूर्वी 2020 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प हे चार तास अहमदाबामध्ये थांबले होते. यावेळी ट्रम्पसाठी रोड शोचे आयोजिन करण्यात आला होता. यावेळी ट्रम्प यांना रस्त्यालगतच्या झोपडपट्टी दिसून नये. यासाठी म्हणून सरकारने रस्त्यालगत झोपडपट्टीसमोर भिंत बांधून गरिबी लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. यावेळी सरकारच्या असंवेदनशीलतेवर विरोधकांनी टीका केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -