Tuesday, April 30, 2024
घरमानिनीRelationshipघरातील ज्येष्ठ नागरिक चिडचिड करताहेत, मग असं करा हँडल

घरातील ज्येष्ठ नागरिक चिडचिड करताहेत, मग असं करा हँडल

Subscribe

एका वयानंतर ज्येष्ठ नागरिक (Senior citizens) हे लहान मुलासारखे वागतात. ते ही लहान मुलासारखे हट्ट करतात आणि बेजबादारपणे वागतात. ज्येष्ठ नागरिकच्या या गोष्टींमुळे तुम्हाला राग येवू शकतो. पण, हे ही तितकेच खरे आहे की, वाढत्या वयात त्यांना त्यांच्या कुटुंबाचा (families) सपोर्टची गरज असते. ज्येष्ठ नागरिक चिडचिड का करतात. कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करतात आणि रागराग करू लागतात. जर असे काही नसले तर ते स्वत:ला उदास होऊन एक कोपऱ्यात बसतात. ज्येष्ठ नागरिकांच्या या वागणुकीमुळे त्यांच्या कुटुंबियांना त्यांना समजणे अवघड होऊन बसते. यामुळे तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसोबत कसे डील कराल. आम्ही तुम्हाला आज तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांनासोबत तुम्ही कशी डील कराल हे जाणून घेणार आहोत.

रागाचे कारण जाणून घेणे गरजेचे

अनेक वेगळा ज्येष्ठ नागरिकांना राग येतो. त्यावेळी ते कुटुंबातील इतर व्यक्तींना बडबड करतात. त्यावेळी त्यांच्या रागाचे खरे कारण, जाणून घेणे महत्त्वाचे असते. एक व्यक्ती रागराग करत असेल, तेव्हा तुम्ही शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे असेत आणि त्यांचा राग शांत केला पाहिजे. कारण, वाद केल्याने भांड वाढू शकते, अशा वेळी तुम्ही जेष्ठ नागरिकांसोबत बसून चर्चा करून त्यांच्या रागामागचे कारण शोधले पाहिजे.

- Advertisement -

ज्येष्ठ नागिरकांना स्पेशल आणि महत्त्व द्यावे

तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात ऐवढे व्यस्त होतात की, यामुळे देखील अनेकदा घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडे तुमचे दुर्लक्ष होते. यामुळे देखील ज्येष्ठ नागरिकांना राग येवू शकतो. यामुळे तुम्ही तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना स्पेशल फिल करून देऊ शकाता. यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि त्यांची काळजी घेणे. याव्यतिरिक्त तुम्ही छोट्या छोट्या कामात तुम्ही त्यांची मदत करू शकता. यामुळे तुम्ही त्यांना प्रेमाची जाणीव करून देऊ शकतात. जसे की, ज्येष्ठी नागरिकांची तब्यात घराब असेल तर त्यांची विचार पूस करणे, मंदिरात घेऊन जाणे आणि जिना चढताना त्यांची मदत करणे, साराख्या गोष्टीने तुम्ही त्यांच्याबद्दल आदर प्रेम दाखवू शकता.

- Advertisement -

ज्येष्ठ नागिरकांची मदत घ्या

कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांचे काम करणे ही चांगली गोष्टी नसते. परंतु, काही वेळी तुमच्या विचारांचा त्यांच्यावर उलटा परिणाम देखील त्यांच्यावर होऊ शकतो. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना एकटे आणि वेगळे देखील वाटू शकते. घरातील लोकांनी आराम करायल सांगा आणि तुम्ही स्वत: काम करा. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना एकटे वाटू शकते. अशावेळी तुम्ही त्यांच्याकडून घरातील छोटी छोटी काम करून घेऊ शकता. यामुळे ते स्वत: एक वाटणार नाही.

तुमचे दु:ख ज्येष्ठांना सांगा

काही लोकांना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या मनातील समस्या शेअर करत नाही. त्यांन वाटते की, ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक गोष्ट सांगणे गरजेचे नाही. त्यामुळे काही वेळी तुम्ही तुमच्या समस्या स्वत: पुरते मर्यादात ठेवता. परंतु, यामुळे ज्येष्ठ नागरिकांना वाटते की, कुटुंबात त्यांना महत्त्व नाही. यामुळे ते उदास आणि चिडचिड करू लागतात.


हेही वाचा – Parenting Tips: तुमच्या मुलाला सतत राग येतो? मग अशी घ्या काळजी

- Advertisment -

Manini