घरपालघर16 वर्षांपासून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्व्हे नाही

16 वर्षांपासून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्व्हे नाही

Subscribe

तसेच काही कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीत आहेत. असे असतानाही या कुटुंब प्रमुखाचे नांव दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट असल्याने या कुटुंबाला शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळत आहे.

वाडा:  गेल्या 16 वर्षांपासून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्व्हे झालेला नसल्याने पालघर जिल्ह्यातील आदिवासी, ग्रामीण आणि दुर्गम भागात अंत्यत हलाकिचे जीवन जगत असलेल्या हजारो कुटुंबियांना त्याचा फटका बसला आहे. 16 वर्षापुर्वीच्या दारिद्र्य रेषेखालील यादीत नावे नसल्याने शासनाच्या अनेक योजनांचा लाभ या कुटुंबांपासुन आजही दुरच राहिला आहे. तर या यादीतील काही कुटुंबे आज सधन झाली असून ते शासनाच्या योजनांचा लाभ मिळवित आहेत.
शासनाकडून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्व्हे सन 2007 मध्ये करण्यात आला होता. यावेळी पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक आदिवासी व ग्रामीण लोकवस्ती असलेल्या वाडा, जव्हार, विक्रमगड, मोखाडा या चार तालुक्यात 65 हजाराहून अधिक कुटुंबे दारिद्र्य रेषेखालील यादीत होते. गेल्या 16 वर्षात या 65 हजार कुटुंबातील अनेक कुटुंबे सधन झाली आहेत. अनेकांकडे दुचाकी, चारचाकी वाहने आली आहेत. तसेच काही कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीत आहेत. असे असतानाही या कुटुंब प्रमुखाचे नांव दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट असल्याने या कुटुंबाला शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळत आहे.

मात्र गेल्या 16 वर्षात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची विभागणी होऊन नव्याने कुटुंबे निर्माण झाली आहेत. यामधील अनेक कुटुंबे ही अत्यंत हालाकिचे जीवन जगत आहेत. या कुटुंबातील सदस्यांचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट नसल्याने या कुटुंबातील सदस्यांना शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित रहावे लागले आहे. पालघर जिल्ह्यात हलाकिचे जीवन जगणारे व दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव नसलेल्या कुटुंबांची संख्या 15 हजाराहून अधिक असल्याचे बोलले जात आहे.
जव्हार तालुक्यात वास्तव्य असलेल्या सुमारे एक लाख चाळीस हजार कुटुंब सदस्य हे दारिद्र रेषा व प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्यांच्या यादीत आहेत. या यादीत अनेक सधन कुटुंबांचा समावेश आहे. ही सधन कुटुंबे दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय मदतीचा लाभ राजरोसपणे घेत असल्याचेही दिसून येत आहे. जव्हार तालुक्यात 31328 शिधापत्रिकाधारक असून यामध्ये 1 लाख 40 हजार कुटुंब सदस्यांचा समावेश आहे. या तालुक्यात 1202 शुभ्रशिधापत्रिकाधारक असून यामध्ये 5908 कुटुंबीय सदस्यांचा समावेश आहे. दारिद्रय रेषेखालील यादीत नांव नसल्याने येथील अत्यंत हलाखीचे जिवन जगणार्या 3728 कुटुंबियांचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट न झाल्याने त्यांना शासनाच्या मोफत योजनांचा लाभ मिळत नाही.

- Advertisement -

विक्रमगड तालुक्यात 33781 शिधापत्रिका धारक कुटुंबे असून 1 लाख 72 हजार 970 कुटुंब सदस्यांचा समावेश आहे. यामधील 16219 कुटुंबे दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट आहेत. या कुटुंबातील 89537 सदस्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे. यामधील अनेक कुटुंबे ही सधन झालेली असतानाही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत. वाडा तालुक्यात दारिद्र्य रेषेखालील यादीत असलेल्या कुटुंबांची संख्या 16976 इतकी आहे. यामधील अनेक कुटुंबे ही सधन असतानाही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत. तर अनेक कुटुंबे अत्यंत हलाखीचे जीवन जगत असतानाही त्यांचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत नसल्याने शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहावे लागले आहे. शासनाच्या योजनांपासून वंचित राहिलेल्या गरिब कुटुंबांची संख्या 10 हजाराहून अधिक आहे.

धनिकांची नांवे दारिद्र्य रेषेच्या यादीत

- Advertisement -

सन 2007 मध्ये तयार करण्यात आलेल्या दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट असलेले काही लाभार्थी हे आज आयकर भरणारे आहेत. त्यामध्ये राजकीय पुढारी, व्यापारी, ठेकेदार, संस्थांचे सभासद, संस्थांचे पदाधिकारी, काही धनिक यांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे काही लाभ धारकांकडे चारचाकी व दुचाकी वाहने असून त्यांनी कोरोना काळात शासनाने वाटप केलेल्या मोफत धान्याचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

शासनाने अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिका धारकांच्या यादीची पडताळणी करण्याची गरज भासत आहे.

  • भास्कर दळवी – संस्थापक, स्थानिक भुमीपुत्र संघटना, पालघर जिल्हा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -