घरपालघरदारिद्य्र रेषेखालील कुटुंबे शासकीय योजनांपासून वंचित

दारिद्य्र रेषेखालील कुटुंबे शासकीय योजनांपासून वंचित

Subscribe

मात्र आताच्या घडीला एकूण कुटुंबाच्या संख्येतही वाढ झाली असून पुर्वी दारिद्र्य रेषेखाली असणारी बहुतांश कुटुंबे आता दारिद्र्य रेषेच्या वर आलेली आहेत.

मोखाडा: शासनाने दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत.मात्र या योजनांचा लाभ खर्‍या दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना मिळण्याऐवजी अपात्र लाभार्थीच जास्त फायदा घेताना दिसत आहेत.त्यामुळे तालुक्यातील अनेक दारिद्रय रेषेच्या खाली असलेली कुटुंबे शासकीय योजनेपासून वंचित राहिली आहेत. ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे अत्यल्प असते अशी कुटूंबे ही दारिद्रय रेषेखाली येतात, त्यांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो.मोखाडा तालुक्यात सन २०११ सालीच्या जनगणनेनुसार १७ हजार ७८९ कुटुंबांपैकी फक्त ९ हजार १४६ कुटुंबे दारिद्रय रेषेखाली आली होती.मात्र आताच्या घडीला एकूण कुटुंबाच्या संख्येतही वाढ झाली असून पुर्वी दारिद्र्य रेषेखाली असणारी बहुतांश कुटुंबे आता दारिद्र्य रेषेच्या वर आलेली आहेत.

परंतु आपली आर्थिक परिस्थिती सुधारलेली असतानाही केवळ शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जुन्याच दारिद्र्य रेषा नंबरचा वापर या कुटुंबाकडून केला जात आहे.यामुळे दिवसेंदिवस गरीब श्रीमंतीच्या आलेखात प्रचंड दरी निर्माण होत चालली असून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील सदस्यांना आजही मजुरीसाठी शहराची वाट धरावी लागत आहे. मात्र हे वास्तव समोर असतानाही शासकीय पातळीवर नव्याने दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याबाबत कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत.या शासनाच्या उदासीनपणा मुळे गरिबीच्या खाईत लोटले गेलेल्या नवीन कुटूंबाचे काय.? असा उद्विग्न प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -