घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरMaharashtra : अतिक्रमण धारकांवर पोलिसांकडून अश्रुधूराच्या नळकांड्या; कुठे घडला प्रकार वाचा?

Maharashtra : अतिक्रमण धारकांवर पोलिसांकडून अश्रुधूराच्या नळकांड्या; कुठे घडला प्रकार वाचा?

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : विश्रांतनगर येथे अनाधिकृत अतिक्रमण हटवण्यावरून मोठा गोंधळ झाला आहे. महापालिकेकडून अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू असताना स्थानिक नागरिकांकडून विरोध केला. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी स्थानिका नागरिकांकडून दगडफेक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर महापालिका आणि पोलीस प्रशासन मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. तेव्हा पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला.

छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांतनगर येथे मोठे प्रमाणात अनाधिकृत अतिक्रमण करण्यात आले. हे अतिक्रमण हटविताना स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध करत आंदोलन केले आहे. या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग होता. यावेळी स्थानिकांना रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा – Baraskar On Jarange : जरांगेंनी अनेकांची घरं उद्ध्वस्त केली; बारसकर महाराजांचा गंभीर आरोप

पोलिसांकडून अश्रुधूराच्या नळकांड्या

महापालिकेने अतिक्रमण हटवण्यासाठी 5 ते 6 जेसीबी, अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि दंगल नियंत्रण पथक देखील विश्रांतनगर येथे तैनात करण्यात आले आहे. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी हे देखील घटनास्थळी उपस्थित आहेत. यावेळी स्थानिक नागरिकांना दगडफेक करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. विश्रांतनगर परिसरातील रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे. कारण अतिक्रिमणामुळे रस्त्याचे काम रखडले असून महापालिकेकडून हे अतिक्रमण हटवणयाचे काम सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -