घरठाणेLok Sabha Election 2024 : चर्चमध्ये घेतली हजारो नागरिकांनी शपथ

Lok Sabha Election 2024 : चर्चमध्ये घेतली हजारो नागरिकांनी शपथ

Subscribe

१०० टक्के मतदानाचा निर्णय

ठाणे – येत्या २० मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ठाणे शहरात रविवारी एक उल्लेखनीय उपक्रम पाहायला मिळाला. 100 टक्के मतदारांचा सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने पोखरण रोड क्रमांक दोन येथील अवर लेडी ऑफ मर्सी चर्चच्या सदस्यांनी देखील १०० टक्के मतदान करणार असल्याची शपथ घेतली.

मतदानाच्या दिवशी असंख्य मतदार आपली जवाबदारी पार न पडता सुट्टीचा गैरफायदा घेत, मतदान न करता फिरायला किंवा गावी जात असतात. मतदान करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे आणि याच जबाबदारीची जाणीव लक्षात घेऊन ठाण्यातील एका चर्चमध्ये चार ते पाच हजार सदस्यांनी मतदान करणार असल्याची शपथ घेतली. त्याचबरोबर पुढील काही दिवसात चर्चचे सदस्य संपूर्ण शहरभर मतदानाचा आकडा वाढवण्यासाठी जनजागृती करणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

मतदानाच्या दिवशी मतदान न करता अनेकदा नागरिक सुट्टीचा गैरफायदा घेत मतदान करण टाळत असतात आणि याचमुळे दिवसेंदिवस मतदानाचा टक्का घसरत असल्याचे आपल्याला दिसते. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी शासन मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे. त्याचबरोबर अनेक सामाजिक संस्था देखील जनजागृती करून मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करताना दिसत आहे. त्यामुळे ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक दोन येथील अवर लेडी ऑफ मर्सी चर्चच्या सदस्यांनी देखील १०० टक्के मतदान करणार असल्याची शपथ घेत जनजागृती करणार असल्याचे सांगितले.

चर्चचे फादर जॉन आल्मेडा यांच्या मार्गदर्शनाखाली 18 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या प्रौढांनी सुमारे चार ते पाच हजार सदस्यांनी निवडणूकीत मतदान करण्याची शपथ चर्चमध्ये घेतली आहे. येत्या काही दिवसांत ठाणे जिल्हाप्रशासनाच्या माध्यमातून मतदानासाठी विविध उपक्रम राबवून जनजागृती करणार आहोत, अशी माहिती बॉम्बे कॅथोलिक सभेचे कार्यकारी समिती सदस्य कॅस्बर ऑगस्टीन यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -