घरपालघरतलासरीमध्ये बस स्टॅन्डविना विद्यार्थी,नागरिकांचे हाल

तलासरीमध्ये बस स्टॅन्डविना विद्यार्थी,नागरिकांचे हाल

Subscribe

मात्र बस स्टँडची दुरुस्ती न झाल्याने त्या जागेवर दुकानदारांनी अतिक्रमण करत दुकाने थाटली आहेत. त्यामुळे जुन्या बस स्टॅन्डची जागा दुकानांनी घेतली आहे.

तलासरीः तलासरी तालुक्यातील तलासरी -उधवा रस्त्यावर पोलीस चौकीच्या बाजूला एसटी महामंडळाचा बस स्टॅन्ड नसल्याने शाळकरी विद्यार्थी, वृद्ध नागरिक यांना बसची वाट पाहत असताना रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागते.
तलासरी तालुक्यातील शाळा, कॉलेज, महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे विद्यार्थी, नागरिक हे उधवाकडे जाण्यासाठी पोलीस चौकीच्या बाजूला तास न तास उन्हा, पावसात बस स्टॅन्ड नसल्याने उभे राहतात. मागील काही वर्षापूर्वी येथे बस स्टॅन्ड होता. मात्र बस स्टँडची दुरुस्ती न झाल्याने त्या जागेवर दुकानदारांनी अतिक्रमण करत दुकाने थाटली आहेत. त्यामुळे जुन्या बस स्टॅन्डची जागा दुकानांनी घेतली आहे.

एसटी महामंडळाचा बस स्टॅन्ड हा तलासरी शहराच्या बाहेर असल्याने शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी त्याठिकाणी चालत जात नाहीत. त्यामुळे तलासरी नाक्यावर पोलीस चौकीच्या बाजूला विद्यार्थी आणि नागरिक यांची गैरसोय लक्षात घेता येथे नवीन बस स्टँड तयार करावे, अशी मागणी विद्यार्थी आणि नागरिक करत आहेत. या समस्यांबाबत डहाणू बस आगार व्यवस्थापक यांना संपर्क केला असता विद्यार्थी आणि नागरिक यांनी शहराबाहेर असणार्‍या बस स्थानकाचा वापर करावा असे सांगितले. मात्र, शहरात बाहेर असणार्‍या बस स्थानकांत विद्यार्थी आणि नागरिक जाण्यासाठी तयार नाहीत.

- Advertisement -

०००

तलासरी तालुक्यातील तलासरी पोलीस चौकी शेजारी उधवाकडे जाणार्‍या बसची शाळकरी विद्यार्थी, वृद्ध नागरिक वाट पाहत रस्त्यावर उभे असतात. त्यांना एसटी महामंडळाने बस स्टँडची सोय करून देऊन गैरसोय दूर करावी.
— सुरेश पाडवी, अध्यक्ष, आदिवासी सेवा संस्था

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -