Wednesday, May 1, 2024
घरमानिनीHealthसोमवारीच येतो जीवघेणा हार्ट अटॅक, संशोधनातून माहिती समोर

सोमवारीच येतो जीवघेणा हार्ट अटॅक, संशोधनातून माहिती समोर

Subscribe

एका नव्या रिसर्चनुसार असे कळते की, हार्ट अटॅक हा आठवड्यातील एका खास दिवशी अधिक येतो असे पाहिले गेले आहे. रिसर्चनुसार, सोमवारच्या दिवशीच सर्वाधिक हार्ट अटॅक येत असल्याचे समोर आले आहे. अभ्यासाचा निष्कर्ष मॅनचेस्टर मध्ये ब्रिटिश कार्डियोवास्कुलर सोसायटी संम्मेलनात सादर केले गेले. हा अभ्यास आयरलँन्ड मधील बेलफास्ट हेल्थ अॅन्ड सोशल केअर ट्रस्ट आणि रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सच्या डॉक्टरांद्वारे केले गेले होते. या शोधात २० हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर अभ्यास केला गेला होता. (Heart attack happens on monday)

संशोधकांना असे कळले की, ST-सेगमेंट एलिवेशन मायोकार्डियल इन्फ्रक्शन (STEMI), जो एक गंभीर प्रकारचा हार्ट अटॅत आहे तो रुग्णांमध्ये दिसून आला. संशोधकांना असे ही कळले की, सोमवारीच्या दिवशीच STEMI हार्ट अटॅक अधिक येतात. एसटीएमआयमध्ये एक प्रमुख कोरोनरी धमनी पूर्णपणे बंद होते आणि त्यामुळे ऑक्सिजन, रक्ताचा पुरवठा होणे बंद होते.

- Advertisement -

सर्केडियन रिदम असू शकते कारण
बेलफास्ट हेल्थ अॅन्ड सोशल केयर ट्रस्टच्या शोधाचे नेतृत्व करणारे कार्डियोलॉजिस्ट यांनी आधीच्या अभ्यासाच्या निष्कर्षांचा हवाला देत असे सांगितले की, सोमवारी असे का होते हे स्पष्ट नाही. पण आम्ही मानतो की, याचा संबंध सर्केडियन रिदम सोबत आहे. जे परिसंचारी हार्मोनला प्रभावित करतो. यामुळेच हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढण्याची शक्यता वाढते. त्यांनी असे सुद्धा म्हटले की, शोधादरम्यान थंडी आणि सकाळच्या वेळी हार्ट अटॅकमध्ये हे बदल पाहिले गेले.(Heart attack happens on monday)

पुढे त्यांनी असे ही म्हटले की, सोमवारी पुन्हा ऑफिसला जाण्याचा स्ट्रेस असतो. तणाव वाढल्याने शरिरात कोर्टीसोल नावाचा स्ट्रेस हार्मोनचा स्तर वाढला जातो जो हार्ट अटॅकची जोखिम वाढवतो.

- Advertisement -

हेही वाचा- स्ट्रेस हार्मोन कोर्टीसोल कमी करण्याचे ‘हे’ तीन उपाय

- Advertisment -

Manini