Saturday, April 27, 2024
घरमानिनीDiaryस्फोटात गमावले दोन्ही हात, राष्ट्रपतींकडून सन्मान, कोण आहे मालविका अय्यर

स्फोटात गमावले दोन्ही हात, राष्ट्रपतींकडून सन्मान, कोण आहे मालविका अय्यर

Subscribe

मालविका अय्यर (Malvika Iyer) हीचा प्रवास हा धैर्य आणि प्रेरणादाय आहे. वयाच्या 13 वर्षी एका स्फोटात दोन्ही हात गमावलेल्या मालविका अय्यरला राष्ट्रपतींनी नारी शक्ती पुरस्काराने (Nari Shakti Award) सन्मानित करण्यात आले आहे. मालविका अय्यर ही इंटरनेशल मोटिवेशनल स्पीकर आहे. तसेच मालविका ही अनेक लोगांची रॉल मॉडले सुद्धा आहे. मालविका ही तामिळनाडूमधील कुंभकोणम येथे 18 फेब्रुवारी 1989 ला तिचा जन्म झाला. पण, मालविकाही राजस्थानच्या बीकानेरमध्ये लहानाची मोठी झाली. मालविकाचे वडिल हे इंजीनिअर असून त्यांची पोस्टिंग ही राजस्थानमध्ये झाली. 2017 मध्ये मालविकांनी सोशल वर्कच्या कामात PHD केली आहे.

मालविका 13 वर्षाची असताना त्यांच्या घरात ग्रेनेड स्फोट झाला होता. यात मालविकाने तिचे दोन्ही हात गमावले. या अपघातात मालविकाचे हात मनगटापासून कापले गेले. तेव्हा तिच्या पायाला देखील दुखापत झाली होती. डावा पाय हा उलटा झाला होता, त्यावेळी डॉक्टरांनी तिच्या कुटुंबियांना तिचा पाय कापण्याचा सल्ला दिला होता. मालविला उठण्यासाठी देखील खूप त्रास होत होता. या दुर्घटनेनंतर मालविका ही जवळपास 18 महिन्यांपर्यंत अंथरुणाला खिळून राहिली. जवळपास सहा महिन्यासाठी मालविकाच्या पायाला फिक्सेटर ड्रिल केले होते. पाय जागच्या जागी ठेवण्याचा हा एकमेव मार्ग होता.

- Advertisement -

 

- Advertisement -

10वीच्या परीक्षेत मालविकांनी केले टॉप

मालविका ही दोन वर्षा अंथरुणाला खिळून राहिल्यानंतर तिने 10वीच्या परीक्षेत टॉप केले. तिने प्रायवेट कॅंडिडेट म्हणून परीक्षा दिली होती. फक्त तीन महिन्यात तिने 10वीच्या परीक्षेची तयारी केली आणि तिला 97 टक्के मिळाले. यानंतर सर्वांचे लक्ष हे मालविकाकडे केले. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी मालविकाला राष्ट्पती भवनमध्ये आमंत्रित केले होते.मालविकाने 2013 मध्ये चेन्नई TEDxYouthमध्ये देखील आमंत्रित करण्यात आले होते. यानंतर मालविकाच्या मोटिवेशनल स्पीकर होण्यास मदत मिळाली.

मालविकाला मिळाला नारी शक्ती पुरस्कार

माजी राष्ट्पती रामनाथ कोविंद यांनी मालविकाला नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालविकाला सोशल मीडिया अकाउंट सांभाळण्यासाठी निवडले होते.


हेही वाचा – देशातील पहिली Transgender सब इन्स्पेक्टर पृथ्वीका यशिनी

- Advertisment -

Manini