घरमुंबईब्लू जेट केमिकल कंपनी स्फोटातील उर्वरित चार कामगारांचे मृतदेह सापडले; मृतांचा आकडा...

ब्लू जेट केमिकल कंपनी स्फोटातील उर्वरित चार कामगारांचे मृतदेह सापडले; मृतांचा आकडा अकरावर

Subscribe

महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीमध्ये दोन दिवसांपूर्वी भीषण आग लागून अकरा कामगार अडकले होते.

महाड : ब्लू जेट हेल्थकेअर या कंपनीमध्ये झालेल्या दुर्घटनेतील उर्वरित चार कामगारांचे मृतदेह देखील सापडले आहेत. यामुळे ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीतील अपघातातील मृतांची संख्या अकरा झाली आहे. यामुळे आताही शोध म्हणून थांबवल्याचे प्रशासनाने जाहीर केले. (Bodies of four remaining workers found in Blue Jet Chemical Co explosion The death toll stands at eleven)

महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीमध्ये दोन दिवसांपूर्वी भीषण आग लागून अकरा कामगार अडकले होते. दिवसभर आग विझवण्याचे काम सुरू असल्याने आग लागलेल्या प्लांटमध्ये नक्की किती कामगार आहेत याची कल्पना कंपनी प्रशासनाला आली नाही. मात्र, सकाळी कंपनीमध्ये दाखल झालेले कामगार आणि बाहेर पडलेले कामगार याचा ताळमेळ तपासल्यानंतर कंपनीत अकरा कामगार अडकले असावेत अशी भीती व्यक्त करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. मात्र यामध्ये खूप वेळ गेला होता. दिवस-रात्र एनडीआरएफ आणि आपदा मित्र संस्था यांनी धुमसणारी आग रासायनिक द्रव्यांची भीती असताना देखील प्लांटमध्ये अडकलेल्या कामगारांचा शोध सुरू केला. प्लांटचा आतील स्लॅब कोसळल्यामुळे आणि आतमध्ये असलेल्या केमिकलचे ड्रम यामुळे जे जवान काळजीपूर्वक काम करत होते. यातच दुसऱ्या दिवशी फक्त सात कामगारांचे मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत सापडले. उर्वरित चार कामगारांचे मृतदेह शोधण्यासाठी शोध मोहीम सुरूच ठेवली. अखेर सोमवार सायंकाळपर्यंत चार कामगारांचे मृतदेह देखील आढळून आले. यामुळे या अपघातातील मृतांची संख्या अकरा झाली आहे. प्राप्त मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत असल्याने हे सर्व मृतदेह डीएनए चाचणीसाठी मुंबई येथे पाठवण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : मुख्यमंत्रीपदाचा स्वप्नातही विचार केला नव्हता पण…; उद्धव ठाकरेंनी सांगितला तो किस्सा

नेमकं काय घडलं होतं?

ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड ही कंपनी रायगडमधील महाड MIDC मध्ये आहे. या कंपनीत 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास मोठा आवाज झाला. हा आवाज स्फोटाचं असल्याचं क्षणार्धात लक्षात आलं. या स्फोटामुळे सगळीकडे धावपण सुरू झाली. आधी गॅस गळती झाली की आधी स्फोट झाला याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही. मात्र, स्फोट आणि ग‌ॅस गळती सुरू झाल्यानंतर, सर्वत्र आग पसरू लागली. या स्फोटानंतर आगीने क्षणार्धात पेट घेत, सगळीकडे आग पसरली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. या घटनेत आधी 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली होती.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -