घरताज्या घडामोडीPakistan : पाकच्या पीएनएस सिद्दीकी नौसेना तळावर हल्ला; BLAच्या माजिद ब्रिगेडने स्वीकारली...

Pakistan : पाकच्या पीएनएस सिद्दीकी नौसेना तळावर हल्ला; BLAच्या माजिद ब्रिगेडने स्वीकारली जबाबदारी

Subscribe

पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात तुर्बत आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नौदल हवाई तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला.

पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात तुर्बत आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नौदल हवाई तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला असून, प्रतिबंधित बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) च्या माजिद ब्रिगेडने तुर्बतमधील नौदल एअरबेसवर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. (pakistan second largest naval air station PNS Siddique in Turbat came under attack)

मिळालेल्या माहितीनुसार, तुर्बतमधील पाकिस्तानचे दुसरे सर्वात मोठे नौदल हवाई स्टेशन पीएनएस सिद्दीकीवर गोळ्यांनी हल्ला करण्यात आला. या परिसरात अनेक स्फोट झाले. बलुचिस्तान प्रांतात चीनच्या गुंतवणुकीला माजिद ब्रिगेडचा विरोध आहे. चीन आणि पाकिस्तान या प्रदेशातील मालमत्तेचे शोषण करत असल्याचा आरोपही करण्यात आल्याचे समजते. तसेच, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी नौदल एअरबेसवरील हल्ला रोखला. यावेळी त्यांनी चार दहशतवाद्यांना ठार केले.

- Advertisement -

दरम्यान, तुर्बतमधील हा हल्ला बीएलए माजिद ब्रिगेडचा आठवड्यातील दुसरा आणि या वर्षातील तिसरा हल्ला आहे. त्यानुसार, 29 जानेवारीला त्यांनी पहिला हल्ला ग्वादरमधील लष्करी गुप्तचर मुख्यालय माच शहरात केला. त्यानंतर 20 मार्चला तुर्बतमधील पाकिस्तानच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या नौदल हवाई तळावर हल्ला केला. 20 मार्च रोजी, पाकिस्तानमधील ग्वादर बंदर प्राधिकरण कॉम्प्लेक्समध्ये अनेक स्फोट आणि गोळीबार झाल्यानंतर सुरू झालेल्या लढाईत किमान दोन पाकिस्तानी सैनिक आणि 8 अतिरेकी मारले गेले.

या हल्ल्याबाबत एका वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार, लढाऊ सैनिक एअरबेसमध्ये घुसल्याचा दावा बीएलएने केला आहे. याशिवाय, या तळावर चिनी ड्रोनही तैनात असून हल्ल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी केच यांनी टीचिंग हॉस्पिटल तुर्बतमध्ये आणीबाणी लागू केली असून, सर्व डॉक्टरांना तातडीने कामावर हजर राहण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : हिमाचलमधील भाजपा पदाधिकाऱ्यांबरोबर कंगनाने धुळवड केली साजरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -