घरक्राइमBangalore Blast : कॅफेतील स्फोटाने बंगळुरू हादरले; चौघे जखमी

Bangalore Blast : कॅफेतील स्फोटाने बंगळुरू हादरले; चौघे जखमी

Subscribe

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूतील एका कॅफेमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये 4 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र हा स्फोट कशामुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही. (Bangalore Blast Cafe blast shakes Bangalore Four injured)

हेही वाचा – Shreevats Goswami : भारतीय क्रिकेटपटूकडून मॅच फिक्सिंगचा आरोप; गांगुली यांनी मागवला अहवाल

- Advertisement -

बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफेमध्ये दुपारी 1 वाजेच्या सुमारास स्फोट झाला. जुन्या विमानतळ रोडजवळ कुंडलहल्ली परिसरातील राजाजीनगर येथील कॅफेच्या व्हाइटफील्ड शाखेमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्र इतकी भीषण होती की, कॅफेचं मोठं नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी धाव घेतली आहे. हा घातपाताचा कट तर नाही ना, त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहे. याशिवाय शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

स्फोटाची बातमी लोकांपर्यंत पोहोचताच गोंधळ उडाला आणि अनेक लोक कॅफेच्या बाहेर व्हिडिओ बनवताना दिसले. स्फोटाची माहिती एचएएल पोलीस ठाण्याचे पथकासह डीसीपी स्वत: घटनास्थळी पोहोचले आहेत. याशिवाय घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम हजर असून त्यांच्या तपासणीनंतरच स्फोटाचे खरे कारण समोर येईल.

हेही वाचा – Budget Session : शिवसेना आमदारांमधील भांडणाचे विधानपरिषदेत पडसाद; विरोधक आक्रमक, सभागृहात गोंधळ

बेंगळुरू सेंट्रलचे भाजपा खासदार पीसी मोहन यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले की, ‘बंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या रहस्यमय स्फोटाबद्दल ऐकून मी काळजीत आहे. पीडित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. अधिकाऱ्यांनी चौकशी करून सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -