घरदेश-विदेशHarda Blast : हरदा स्फोटामुळे भूकंप सदृश परिस्थिती; 40 किमीपर्यंत बसले हादरे

Harda Blast : हरदा स्फोटामुळे भूकंप सदृश परिस्थिती; 40 किमीपर्यंत बसले हादरे

Subscribe

हरडा : मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात आज (6 फेब्रुवारी) एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की याचे हादरे परिसराच्या 40 किलोमीटरपर्यंत जाणवले. कच्च्या घरांची पडझड, सरकारी रुग्णालयाच्या काचा फुटल्या आणि आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोळ पसरले होते. या भीषण स्फोटात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 59 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. (Harda Blast Earthquake like conditions due to Harda Blast Tremors felt up to 40 km)

हेही वाचा – Rahul Gandhi : ‘भाजपाने दिवस मोजायला सुरुवात करावी’, राहुल गांधींनी जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांवर साधला निशाणा

- Advertisement -

सकाळी साधारण 11.40 वाजता कारखान्यात भीषण स्फोट झाला. यानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्या स्थानिक व्यक्तीने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी फटाका कारखान्यापासून 800 मीटर अंतरावर असलेल्या घंटाघर मार्केटमध्ये उभा होता. भीषण स्फोटाचे हादरे घंटाघर बाजारपेठेपर्यंत जाणवले. त्यामुळे घाबरलेल्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली पळू लागले. त्याठिकाणी खरेदीसाठी आलेले ग्राहकही तिथून निघून गेले. स्फोटानंतर कारखान्यावरून उठणारे धुळीचे ढग घंटाघर मार्केटपर्यंत पोहचले. तोपर्यंत संपूर्ण बाजारपेठ रिकामी झाली होती.

लोखंडी आणि टिन शेडचे तुकडे 500 मीटर अंतरापर्यंत उडाले

स्फोटामुळे दगड, लोखंडी व टिनचे तुकडे कारखान्यापासून 500 मीटर अंतरापर्यंत उडाले आणि जीव वाचवण्यासाठी धावणाऱ्या लोकांवर आदळले. यावेळी कोणाचा मृत्यू झाला, तर काहींचा हात कापला गेला. याचवेळी त्या परिसरात असलेली कच्च्या घरांची पडझड झाली. सुमारे तासभर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट सुरूच होता. घटनास्थळापासून 40 किमी अंतरावर असलेल्या सिवनी माळवे, बैरागढपासून 30 किमी अंतरावर असलेल्या तिमरणी, 35 किमी अंतरावर असलेल्या खिडकिया आणि खाटेगाव याठिकाणी भीषण स्फोटामुळे जमीन हादरली. तर कारखान्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शासकीय रुग्णालयाच्या काचा फुटल्या आणि आजूबाजूच्या इमारतींचेही मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : आरोप करणाऱ्यांचे शेकडो फोटो दाखवता येतील; शिंदे गटाचे प्रत्युत्तर

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची नुकसान भरपाई 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार आहे. सध्या सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गंभीर जखमींना भोपाळ आणि इंदूरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. याशिवाय त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही सरकार उचलणार आहे. तसेच अशी कोणतीही घटना पुन्हा घडू नये यासाठी आमचे सरकार कठोर पाऊल उचलेले, अशी माहिती मोहन यादव यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -