घरदेश-विदेशBlast in MP : मध्य प्रदेशात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 11 मृत,...

Blast in MP : मध्य प्रदेशात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 11 मृत, 59 जखमी

Subscribe

हरदा : मध्य प्रदेशातील हरदा याठिकाणी फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला असून 59 जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. स्फोटामुळे कारखान्याच्या परिसराचे मोठे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावून अधिकाऱ्यांकडून घटनेची संपूर्ण माहिती घेत आवश्यक ते निर्देश दिले आहेत. (Blast in MP Massive blast in firecrackers factory in Madhya Pradesh 11 dead 59 injured)

हेही वाचा – Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस ‘बेपत्ता’; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर भाजपाचे जोरदार प्रत्युत्तर

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, हरदा येथील बैरागढ येथील फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला. अनेक लोक आत अडकल्याची शक्यता आहे, त्यांना वाचवण्यासाठी एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाही पोहोचल्या आहेत. तसेच अनेक जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कारण आगीवर नियंत्रण मिळविण्यात विलंब होत असल्याने आग सतत भडकताना दिसत आहे. दरम्यान, या भीषण दुर्घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात घटनास्थळी अधूनमधून स्फोटांसह उंच ज्वाळा दिसत आहेत आणि लोक स्वतःला वाचवण्यासाठी धावताना दिसत आहेत.

- Advertisement -

प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, कारखान्यात किती लोक आहेत यासंदर्भात माहिती नाही. परंतु कारखान्यात आणि आजूबाजूला अनेक लोक अडकल्याची भीती आहे. सध्या या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला असून 59 जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या कारखान्यातील आग आटोक्यात आणणे हे पहिले प्राधान्य आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

34 एसडीआरएफ जवान घटनास्थळी दाखल

हरदा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर नर्मदापुरम आणि बैतुल जिल्ह्यातून एसडीआरएफचे जवान आणि मदत सामग्री पाठवण्यात आली आहे. नर्मदापुरम येथून तीन रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. याशिवाय 19 एसडीआरएफ जवानांना मदत आणि बचाव सामग्रीसह हरदा येथे पाठवण्यात आले आहे. ज्यात अग्निशामक, फायर एंट्री चुट, सर्च लाईट, स्ट्रेटनर, हेल्मेट, श्वासोच्छवासाची उपकरणे यांचा समावेश आहे. बैतूल येथून 15 एसडीआरएफ जवान, एक पीसी आणि एक वाहन दल हरदा येथे पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा – Maharashtra Politics : आरोप करणाऱ्यांचे शेकडो फोटो दाखवता येतील; शिंदे गटाचे प्रत्युत्तर

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची नुकसान भरपाई 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार आहे. सध्या सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गंभीर जखमींना भोपाळ आणि इंदूरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. याशिवाय त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही सरकार उचलणार आहे. तसेच अशी कोणतीही घटना पुन्हा घडू नये यासाठी आमचे सरकार कठोर पाऊल उचलेले, अशी माहिती मोहन यादव यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -