घरदेश-विदेशAir India : अमेरिकेला जाणाऱ्या विमानाचे रशियात इमर्जन्सी लँडिंग, प्रवाशांची गैरसोय

Air India : अमेरिकेला जाणाऱ्या विमानाचे रशियात इमर्जन्सी लँडिंग, प्रवाशांची गैरसोय

Subscribe

नवी दिल्ली : दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला (Delhi to San Francisco) जाणाऱ्या एअर इंडियाच्या (Air India) विमानाचे रशियात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. 6 जून रोजी दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणारे एअर इंडियाचे विमान AI173 इंजिनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे वळवण्यात आले आणि रशियातील मगदान (Magadan, Russia) येथे उतरवण्यात आले. तथापि, या विमानातील सर्व प्रवाशांना भाषेमुळे संवाद साधण्यात अडथळा येत असून स्थानिक अन्न आणि निकृष्ट निवासव्यवस्था यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या सर्व परिस्थितीवर अमेरिकाही या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

- Advertisement -

आता या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विमानातील सर्व प्रवासी जमिनीवर झोपलेले दिसत आहेत. तथापि, एअर इंडियाने आपल्या वतीने एक निवेदन जारी केले आहे. विमान लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना पूर्ण सुविधा पुरवल्या जात आहेत. यासोबतच प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दलही खंत व्यक्त करण्यात आली, असे या निवेदनात म्हटले आहे.

इमर्जन्सी लँडिंगनंतर सॅन फ्रान्सिस्कोला जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना रशियाची राजधानी मॉस्कोपासून 10,000 किमी अंतरावर असलेल्या मगदानमधील एका डॉर्मिटरीमध्ये ठेवण्यात आले आहे. कारण, एअर इंडिया बोईंग 777-200 विमानात 216 प्रवासी आणि 16 कर्मचारी असून त्यांच्या निवासाची व्यवस्था होऊ शकेल, एवढ्या क्षमतेचे हॉटेल मगदानमध्ये नाही.

- Advertisement -

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे निवेदन
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने देखील यासंदर्भात आता एक निवेदन जारी केले आहे. नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असून मगदानमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सॅन फ्रान्सिस्कोला नेण्यासाठी दुसऱ्या विमानची व्यवस्था करण्यात आल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

अमेरिकेचीही नजर
सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे रशियामध्ये इमर्जन्सि लँडिंग झाल्यानंतर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेला येणाऱ्या एक विमानाचे रशियामध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती मिळाली असून आम्ही या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. विमानात किती अमेरिकन नागरिक होते हे मी सांगू शकत नाही, असे यूएस स्टेट डिपार्टमेंटचे उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -