Thursday, May 2, 2024
घरमानिनीCareer Option : महिलांनो 'या' ट्रेंडिंग क्षेत्रांमध्ये करा करिअर

Career Option : महिलांनो ‘या’ ट्रेंडिंग क्षेत्रांमध्ये करा करिअर

Subscribe

या करिअर ऑप्शन्सकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. तसेच महिलांसाठी उत्तम संधी यामध्ये खूप आहेत.

महिलांना स्वतंत्र आयुष्य हवे असते आणि अशातच करिअरमध्ये त्यांना नेहमी विचार करावा लागतो. आपल्या आवडीनुसार त्यांना वेळोवेळी संघर्ष करावा लागतो. आणि म्हणूनच असे काही पर्याय आहेत जिथे महिलांनी करिअरसाठी बघावे.

How Guardian Life recruits women for sales careers - The Business Journals

- Advertisement -
  • मीडिया क्षेत्रात करिअर-
    स्त्रियांचा आवाज आणि त्यांचाकडे असलेली संवादाची मांडणी उत्तम असते. लोकांशी संवाद साधण्याची, संशोधन करण्याची आवड असेल,तर त्यांच्यासाठी प्रसारमाध्यमे हे एक उत्तम क्षेत्र आहे.
  • टिचिंग क्षेत्रात करिअर-
    टिचिंग हे महिलांसाठी नेहमीच सर्वोत्तम करिअर मानले गेले आहे. भारताच्या शिक्षण क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे गेल्या काही काळात नोकरीच्या संधींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
  • ह्युमन रिसोर्समध्ये करिअर-
    ह्युमन रिसोर्स व्यवस्थापन हा महिलांसाठी झपाट्याने वाढणाऱ्या करिअर पर्यायांपैकी एक आहे. चांगली सुरुवात करण्यासाठी महिलांनी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एमबीए किंवा पीजीडीएम मिळवू शकतात.
  • न्यूट्रिशनिस्ट म्हणून करिअर-
    हल्ली सगळ्यांमध्ये तंदुरुस्त आणि निरोगी असण्याबाबत लोकांमध्ये जागरुकता वाढत आहे. महिला या क्षेत्रात न्यूट्रिशनिस्ट, डायटीशियन, फिटनेस इन्स्ट्रक्टर आणि योगगुरू यांसारख्या क्षेत्रात करिअर करू शकतात.
  • मानसशास्त्रमध्ये करिअर-
    स्त्रियांसारखे प्रश्न कोणी सोडवू शकत नाही, असे म्हटले जाते. अशातच बहुतेक स्त्रिया चांगल्या निरीक्षक, सहानुभूतीशील श्रोत्या आणि उत्तम संवादक असतात. त्यामुळे त्यांनी या क्षेत्रात करिअर करावे.
  • इंटिरिअर डिझायनर-
    घराची अंतर्गत सजावट करण्यात स्त्रिया आघाडीवर असतात. तसेच इंटिरिअर डिझायनर म्हणून आपला स्वतःचा त्या व्यवसायही करू शकता.
  • ब्लॉगिंग क्षेत्रात करिअर-
    आजकाल बहुतेक कन्टेन्ट ऑनलाइन वाचली जात असल्याने, ऑनलाइन साइट्ससाठी ब्लॉगिंग किंवा कंटेन्ट लेखनाला आजकाल प्रचंड मागणी आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रामध्ये प्रचंड पैसे कमवता येऊ शकतो.

हेही वाचा :

Wedding Tips: लग्नानंतर चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी

- Advertisment -

Manini