घरमनोरंजनया सेलिब्रिटीजला आलेत भुताटकीचे अनुभव

या सेलिब्रिटीजला आलेत भुताटकीचे अनुभव

Subscribe

तापसी पन्नू

तापसीने एका मुलाखतीत सांगितले आहे की मी आणि क्रू हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमधील एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्या हॉटेलमध्ये भुताटकी असल्याचे किस्से आम्ही ऐकले होते. पण माझा विश्वास नव्हता.

- Advertisement -

मात्र रात्री मी झोपलेले असताना मला माझ्या खोलीत अजून कोणीतरी असल्याचे जाणवले. मला पावलांचा आवाज ऐकू आला. त्यामुळे मी प्रचंड घाबरले मात्र उठून बघाव येवढी मी बहादुर नाही. त्यामुळे मी गपचुप आहे तशी अंथरुणात पडून राहीले. सकाळी उठल्यावर मी हा किस्सा टीमला सांगितला आणि आम्ही हॉटेल सोडलं.

- Advertisement -

sunny leone next project marathi movie aamdar niwas

सन्नी लियोनी
मी राजस्थानमधील एका राजवाड्यात स्प्लिट्सविलाच्या एका सीझनचे शूटिंग करत होतो. रात्री मी माझ्या रुममध्ये झोपली असताना मला अचानक माझे शरीर हलत नसल्याचे जाणवले. जणू कोणीतरी मला घट्ट धरून ठेवले होते. असे तीनदा झाल्यानंतर मी सर्व बळ एकवटून उठून बसले आणि जोरात ओरडले की ‘मला एकटे सोडा!’ त्यानंतर मात्र माझं अंग नॉर्मल झालं. शरीरावरचा तणाव गायब झाला. मला हलकं वाटलं. तो भुताटकीचाच अनुभव होतो.

kriti senan 3 news

क्रिती सेनन
क्रिती सेनन हीला देखील भुताटकीचा अनुभव आला आहे. यावर बोलताना तिने सांगितले की दिलवालेचे शूटिंग करताना मी माझ्या मेकअप आर्टिस्टच्या रुममध्ये गप्पा मारत बसलो होते. तेव्हा तिच्या हॉटेलच्या खोलीत कोणीतरी असल्याचं जाणवलं. बॉडी लोशनची एक बाटली पडली होती, म्हणून तिने ती पुन्हा जागेवर ठेवली, पण ती पुन्हा पडली. तिला आश्चर्य वाटले कारण टेबल हलत नव्हते आणि वाराही नव्हता. रात्री तिला असे वाटले की कोणीतरी तिला ढकलत आहे, आणि तेव्हाच आम्ही सर्व घाबरलो होतो.

 

सोहा अली खान
गँग्स ऑफ घोस्ट्सच्या शूटिंगदरम्यान सोहा अली खान आणि तिची सहकलाकार माही गिल यांना चित्रपटाच्या सेटवर एक विचित्र अनुभव आला. त्यांना रिकाम्या खोल्यांमधून विचित्र आवाज ऐकू आला. चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांनी आपली बॅग भरली आणि लगेचच ते ठिकाण सोडले.

BIPASHA BASU

बिपाशा बसू
आत्मा या सिनेमाच्या सेटवर अभिनेत्रीने एका सीनच्या शूटिंगदरम्यान एका महिलेला गाताना ऐकले. जेव्हा टीमने रेकॉर्डिंग पुन्हा वाजवले तेव्हा टेपवर कोणताही आवाज नव्हता. पुढे, भिंतीला टांगलेली एक फोटो फ्रेमही अचानक जमिनीवर पडली. त्यानंतर आमच्या टीमने लगेचच तिथून पळ काढला असे बिपाशाने सांगितले आहे.

 

 


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -