घरदेश-विदेशPM Modi on Lalu Prasad Yadav : 'हा देशच माझे...', लालूंच्या कुटुंबावरील...

PM Modi on Lalu Prasad Yadav : ‘हा देशच माझे…’, लालूंच्या कुटुंबावरील टीकेला पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर

Subscribe

पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या बेतीया येथे एका सभेत राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावर जोरदार टीका केली. लालू आणि त्यांचे कुटुंब बिहार राज्याचे सगळ्यात मोठे गुन्हेगार आहेत. एका दशकापेक्षा जास्त काळाच्या राजवटीत त्यांनी बिहारमध्ये फक्त जंगलराज आणले, अशा शब्दात मोदी यांनी लालू यांना फटकारले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आल्यानंतरच राज्यात काही सुधारणा झाली आहे. काही दिवसांपूर्वीच लालू प्रसाद यादव यांनी मोदी विरोधी आघाडी अर्थात इंडिया आघाडीच्या पाटणा येथे झालेल्या सभेत मोदींना कुटुंबच नसल्यावरून टीका केली होती. त्यांच्या या टीकेचा देखील समाचार पंतप्रधानांनी घेतला.

हेही वाचा – Prakash Ambedkar : ईव्हीएम हॅक करत आंबेडकर म्हणाले, भाजपा 400 पार अशक्य! 

- Advertisement -

संपूर्ण देश हेच माझे कुटुंब

माझे कुटुंब नाही ही त्यांची माझ्याबद्दल तक्रार आहे. मात्र संपूर्ण देश हेच माझे कुटुंब आहे आणि आज सगळा देशही म्हणतो आहे की, ते स्वत:ला मोदींच्या कुटुंबांचे सदस्य मानतात, असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. एवढंच नाही तर, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, बाबासाहेब आंबेडकर, कर्पुरी ठाकुर हे महान नेते आज जिवंत असते तर आपल्या कुटुंबाला पुढे नेले नाही म्हणून त्यांच्यावरही या लोकांनी टीका केली असती.

हेही वाचा – UCO Bank: बँकेच्या चुकीमुळे ग्राहकांच्या खात्यात 820 कोटी रुपये; CBI ची 67 ठिकाणी छापेमारी

- Advertisement -

द्रमुकचे नेते ए. राजा यांच्या वादग्रस्त विधानाच्या अनुषंगाने मोदी म्हणाले की, बिहार ही ऋषी वाल्मिकी यांची भूमी आहे. माता सीतेने येथेच आश्रय घेतला होता. लव आणि कुश यांचा जन्म येथेच झाला. मात्र त्याच प्रभू श्रीरामाचा इंडिया आघाडीकडून जो अपमान केला जातो आहे त्याकरता येथील जनता त्यांना कधीच माफ करणार नाही. आपली संस्कृती आणि परंपरेवर केल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या हल्ल्यांना कोण प्रोत्साहन देतो आहे हेही लोक पहात आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच लालू प्रसाद यादव यांनी मोदी विरोधी आघाडी अर्थात इंडिया आघाडीच्या पाटणा येथे झालेल्या सभेत मोदींना कुटुंबच नसल्यावरून टीका केली होती. त्यांच्या या टीकेचा देखील समाचार पंतप्रधानांनी घेतला. यासोबतच, आई गेल्यावर नरेंद्र मोदी यांनी केस न कापल्याने ते हिंदू देखील नसल्याचेही वक्तव्य त्यांनी केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -