Tuesday, May 21, 2024
घरमानिनीमांजरांमुळे होऊ शकतो हा मानसिक विकार

मांजरांमुळे होऊ शकतो हा मानसिक विकार

Subscribe

पाळीव प्राणी मानवाचे चांगले मित्र मानले जातात. आपल्या आजूबाजूस पाळीव प्राणी प्रेमी कायमच दिसतात. पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा, मांजर, पक्षी घरत पाळले जातात. त्यातल्या त्यात मांजर जास्त प्रमाणात पाळली जाते. अनेक घरात अगदी लहान बाळा प्रमाणे तिचे लाड पुरविले जाते. तिला अंगा- खांद्यावर खेळविले जाते. पण, तुमची ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

एका संशोधनानुसार, पाळीव प्राण्यांसोबत चालल्याने किंवा खेळल्याने ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉलची लेव्हल आणि ट्रायग्लिसरॉइडची लेव्हल नियंत्रणात राहते, असे सिद्ध झाले आहे. पाळीव प्राणी कायमच एकटेपणा आणि नैराश्य व्यवस्थापित करण्यास मदत करतात. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार असे म्हणण्यात आले आहे की, मांजरीमुळे स्किझोफ्रेनिया होऊ शकतो म्हणजेच स्किझोफ्रेनिया होण्यासाठी मांजर कारण ठरू शकते.

- Advertisement -

मांजरीचे आणि मानसिक आजाराचे कनेक्शन (Relation between cats and mental health)

अभ्यासानुसार मांजरी आणि मानसिक विकार यांच्यात एक कनेक्शन असल्याचे आढळून आले आहे. यात असे सांगण्यात आले आहे की, मांजरीच्या संपर्कात आलेल्या लोकांना स्किझोफ्रेनिया होण्याची शक्यता दुपटीने जास्त आहे. मांजरीमध्ये टॉक्सोप्लाझमा पॅरासाइट असतो. आपण एक लक्षात घ्यायला हवे, कोणतीही मांजर माणसांना संक्रमित करू शकत नाही. मांजरीच्या संपर्कातून तो मानवापर्यंत पोहोचू शकतो.

कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना अधिक धोका (People With Weak Immunity are more at risk) 

अभ्यासानुसार, टॉक्सोप्लाजमोसिस प्रेग्नेंट महिला आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकते. हा पॅरासाईट मेंदूत जास्त वेळ राहिल्यास स्किझोफ्रेनिया आणखीनच तीव्र होतो. ज्याप्रमाणे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या लोकांना विविध आजारांचा धोका असतो त्याचा प्रमाणे याचाही निर्माण होतो.

- Advertisement -

आजारापासून दूर राहण्यासाठी सेफ्टी टिप्स –

  • मांजरी किंवा कोणत्याही पाळीव प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर लगेचच हात धुवा.
  • पाळीव प्राण्यांना खायला दिल्यानंतर किंवा त्याचे उरलेले अन्न टाकल्यानंतर हात स्वच्छ धुवा.
  • नियमित मांजरीची जागा, पिंजरा, जेवणाची भांडी स्वच्छ करा.
  • जेव्हा तुम्ही मांजरीला अंघोळ वैगरे घालाल, त्यानंतर स्वतःचे हात पायही स्वच्छ करायला विसरू नका.
  • मांजरीला कधीच कच्चे अन्नपदार्थ खायला देऊ नका.
  • तुमच्या घरची कचरापेटी दररोज स्वच्छ करा.

 

 

 


हेही पहा : तुम्हीही पाळीव प्राण्यांसोबत झोपता?, जाणून घ्या परिणाम 

Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini