घरक्राइमभगूरमध्ये दोन गटात हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

भगूरमध्ये दोन गटात हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

Subscribe

भगूर येथील समतावाडीत दोन गटामध्ये शिवीगाळ व लाठ्याकाठ्यांची मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनोद जयवंत सोनवणे (रा. समतावाडी, भगूर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित सागर चंद्रमोरे, मनोज जगताप, हर्षल निरभवणे, संघर्ष मोरे, विवेक चंद्रमोरे, प्रक्षीक पगारे, हर्षल मोरे (सर्व जण रा. समतावाडी भगूर) यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर, मनोज पोपट जगताप (रा. समतावाडी) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित विनोद जयवंत सोनवणे, आनंद सोनवणे, केतन आनंद सोनवणे, प्रफुल्ल राजू सोनवणे, राजू जयवंत सोनवणे, प्रवीण सुरेश तेलोरे, सुनील रामराजे (सर्व रा. समतावाडी) यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटात सोमवारी (दि. १५) सायंकाली साडेसहाच्या सुमारास बुद्धविहार शेजारील समतावाडी येथे मारामारीची घटना घडली आहे.

दुचाकी घसरल्याने चालक ठार

कामावरून घरी परतत असताना सोनी पैठणी समोर वळणावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार ठार झाला. अनिल राम पुरी (६४, रा. युनिटी पार्क, विसे मळा, कॉलेजरोड) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघात सोमवारी (दि. १५) घडला. उपचारासाठी खासगी रुग्णालयातून जिल्हा रुग्णालात दाखल केले असता वैदयकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

शहरात दोन दुचाकींची चोरी

चोरट्याने खडकाळी येथील कब्रस्तान येथून इब्राहिम गयासोद्दीन शेख (रा. अशोकनगर, सातपूर) यांची दुचाकी शनिवारी (दि. १३) रात्री पावणेबाराच्या सुमारास चोरून नेली. याप्रकरणी भदक्राली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप भगवंत कुलकर्णी (रा. श्रमिकनगर, सातपूर) यांची २० हजारांची दुचाकी (एमएच १५ एफपी २६८७) रविवारी (दि. १४) रात्री आठ ते नऊच्या दरम्यान मुंबई नाका येथील एसबीआय बँकेसमोरून चोरीला गेली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी वसंत वाघमारे (रा.शिवाजी चौक, जुने सिडको) यांची दुचाकी (एमएच १५ डीपी ३१३४) शुक्रवारी (दि. १२) सातपूर येथील मनपाच्या जलतरण तलाव येथून चोरीला गेली. याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जॉगींग ट्रॅकजवळ वयोवृद्ध महिलेची सोन्याची माळ हिसकावली

इंदिरानगर जॉगींग ट्रॅकजवळ ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील ४५ हजारांची सोन्याची माळ दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी बळजबरीने खेचून नेल्याची घटना घडली. शैला बाळकृष्ण भोंडे (रा. क्रांती बंगला, वडाळा-पाथर्डी गाव) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. १५) पहाटे साडेसहा-पावणे सातच्या दरम्यान त्या इंदिरानगर जॉगींग ट्रॅकजवळील श्रीजी संकल्प बिल्डिंग जवळ असताना दुचाकीवरून आलेल्या दोगा संशयितांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची अष्टैलूची सोन्याची माळ खेचून पोबारा केला. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुनहा दाकल करण्यात आला आहे.

- Advertisement -

बहीण-भावाला नोकरीचे आमिष; ९ लाखांना गंडा

कामटवाडा शिवारातील बहीण-भावाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून संशयिताने तब्बल ९ लाखांना गंडा घातला आहे. संदीप बाबुलाल वाघ (४०, रा. अंबड) असे संशयिताचे नाव आहे.

अक्षय शरद शिरोडे (रा. मुरारीनगर, कामटवाडा शिवार) यांच्या फिर्यादीनुसार नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांची संशयिताशी ओळख झाली होती. त्यानंतर संशयिता त्यांना व त्यांच्या बहिणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी संशयिताने ९ लाख रुपये घेतले. परंतु त्यानंतरही नोकरी न लागल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिरोडे यांनी अंबड पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुने सीबीएस परिसरात युवकाला मारहाण

जुने सीबीएसच्या गेटजवळ तिघा संशयितांनी एका युवकाला शिवीगाळ करीत मारहाण केली. जॉय अनिल वाघमारे (रा. मिशन मळा, शरणपूर रोड) याच्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि. १४) रात्री सव्वा अकराच्या सुमारास मद्याच्या नशेतील संशयितांनी जॉय याच्याशी वाद घालत शिवीगाळ केली आणि डोक्यात वीट मारून दुखापत केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली

मखमलाबाद परिसरातील रामकृष्णनगर येथे मंगळवारी (दि. १६) रात्री आठच्या सुमारास पादचारी महिलेच्या गळ्यातील ७० हजारांची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी खेचून पोबारा केला. सरिता राहुल गांगुर्डे (रा. रामकृष्णनगर, मखमलाबाद) यांच्या पियार्दीनुसार याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरकोळ कारणातून मायलेकींना मारहाण

हिरावाडीतील दामोदरनगरमध्ये किरकोळ कारणातून चार संशयितांनी मायलेकींना मारहाण केली. भरत कुकडे, पिंकी कुकडे, सोनी कुकडे, अलका माळी (सर्व जण रा. दामोदरनगर, हिरावाडी रोड) अशी संशयितांची नावे आहेत. मीनाक्षी पुरुषोत्तम परमार (रा. दामोदर नगर) यांच्या फिर्यादीनुसार, २४ मार्च रोजी सकाळी दहाच्या सुमारास सामाईक भिंतीचे होल बुजविण्यावरून संशयितांनी मायलेकींना शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -