घरमहाराष्ट्रपुणेपुणेकरांनो मांजर पाळताय? आधी घ्यावी लागेल महापालिकेची परवानगी

पुणेकरांनो मांजर पाळताय? आधी घ्यावी लागेल महापालिकेची परवानगी

Subscribe

परवाना मिळविण्यासाठी अर्ज भरून मांजराचे तीन फोटो आणि 50 रूपये शुल्क अर्जासोबत महापालिकेला द्यावे लागणार आहेत.

अनेकांना मांजर हा प्राणी खूप आवडतो. त्यामुळे अनेकजण त्यांच्या घरात मांजर पाळतात. मांजर पाळण्याची आवड असणाऱ्या पुणेकरांसाठी  (pune) मात्र ही बातमी महत्वाची आहे. पुण्यात जर का कोणाला मांजर पाळायची असेल तर त्यासाठी आधी महापालिकेकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. या आधीही कुत्रा पाळण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक होते. त्यानंतर आता मांजर पाळण्यासाठीही परवानगी घेणे आवश्यक आहे.

पुण्यामध्ये कुत्र्यासोबतच आता मांजर पाळणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने महापालिकेने मांजर पाळण्यासाठी परवाना घेण्याचा नियम केला. परवाना मिळविण्यासाठी अर्ज भरून मांजराचे तीन फोटो आणि 50 रूपये शुल्क अर्जासोबत महापालिकेला द्यावे लागणार आहेत. यासोबतच अँटीरेबीज लसीकरण प्रमाणपत्रही सादर करावे लागणार आहे. याबाबतचे सर्व आदेशच पुणे महापालिकेकडून देण्यात आले आहेत.

- Advertisement -

ज्यांना मांजर पाळायची आहे त्यांना ही नोंदणी प्रतिवर्षी नव्याने करावी लागणार आहे. नूतनीकरण करताना 50 रुपये परवाना शुल्काशिवाय अतिरिक्त 25 रुपये शुल्क घेतले जाणार आहे. याला स्थायी समितीनेसुद्धा मान्यता दिली आहे. महापालिकेने (pune municipal corporation) कुत्र्यांची नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली आहे. त्याचबरोबर मांजराची नोंदणीही ऑनलाइन पद्धतीने करण्याची प्रक्रिया आठवड्याभरात करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान कुत्रे, घोडे, मांजर अशा सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांची नागरिकांनी महापालिकेकडे नोंदणी करून परवाना घेणे आवश्‍यक आहे. पण पुण्यातील नागरिकांनी महापालिकेच्या या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे. महापालिकेने दिलेल्या माहिती नुसार शहरात 1 लाखापर्यंत पाळीव कुत्रे आहेत त्यापैकी केवळ 5 हजार 500 कुत्र्यांची नोंदणी महापालिकेकडे झाली आहे. पुण्यात आता मांजर पाळण्याचेही प्रमाण वाढत आहे. म्हणून महापालिकेने हा नियम केला आहे.


हे ही वाचा –  युवकांनी सुरु केली ‘बिबट सफारी’; जुन्नर तालुक्यातील प्रयोग

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -